आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दहा वर्षापासून होणाऱ्या अखिल भारतीय हिंदूराष्ट्र अधिवेशनामुळे देशात हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू झाली. त्यानुसार हिंदूराष्ट्र निर्मितीचे कार्य सुरू झाले आहे. हे दहावे अधिवेशन असून यात हिंदूराष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अधिवेशनात विशेष म्हणजे हिंदूराष्ट्र संसद घेण्यात येत आहे. १२ ते १८ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे नीलेश टवलारे यांनी पत्रपरिषदेत दिली. कोरोनामुळे दोन वर्षे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. २०२० मध्ये ऑनलाइन अधिवेशन घेण्यात आले. यावर्षी होणाऱ्या अधिवेशनात देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अधिवेशनात अमेरिका, इंग्लंड, हॉंगकॉंग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशासह भारतातील २६ राज्यातील ३५० हून अधिक हिंदू संघटनांच्या १ हजारापेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला अमरावती येथून शिवधारा आश्रमाचे पू. संतोषकुमार महाराज, राम प्रिय फाऊंडेशनच्या रामप्रियाजी माई, जगद्गुरू राजराजेश्वर माऊली सरकार, पतंजली योगपीठाचे संस्थापक सदस्य चंद्रकुमार जाजोदिया आदी उपस्थित राहणार आहे. या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ४५ हून अधिक हिंदू संघटना, संप्रदाय, विद्यापीठे, अधिवक्ता संघटना, उद्योजक आदींनी समर्थन दिले असल्याचे टवलारे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला योगेश मालोकार, प्राजक्ता जामोदे, मदन तिरमारे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.