आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सर्वच अडकलेत सोशल मीडियाच्या विळख्यात!; मानसिक व शारीरिक आजारांमध्ये वाढ होत असल्याने तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले, तरी त्याच्या अतिवापरामुळे मात्र माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे जवळचे दूर जात असल्याचे चित्र आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत आहे. काही अपवाद वगळता लहान मुलांपासून ते तरुणाई व ज्येष्ठांपर्यंत बहुतेक जण सोशल मीडियाच्या गर्तेत हरवत आहेत. विशेषत: तरुणांमध्ये हे व्यसन दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत शहरातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

साेशल मीडिया हे व्यक्त होण्याचे एक चांगले माध्यम आहे, परंतु लाईक, कमेंट, शेअरच्या भासमान जगात अडकलेले लहानथोर त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकत आहेत. त्यामध्ये तरुणाईचा टक्का अधिक आहे. फोटो, पोस्ट, विचार आदींच्या माध्यमातून या मंचावर व्यक्त होण्याच्या प्रकाराचा अतिरेक होत आहे. त्यावर कुणी प्रतिक्रिया दिली नाही, तर अनेकजण निराश होतात. दीड जीबीच्या आहारी गेलेल्यांना जर कोणत्या कारणामुळे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळत नसेल, तर ते अस्वस्थ होतात. अलिकडे अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठांमध्येही सोशल मीडियाचा अतिवापर वाढला आहे.

त्यामुळे त्यांच्यातही नैराश्य, मानसिक आजार बळावत आहेत. काही अपवाद वगळता साेशल मीडिया व इंटरनेटच्या आहारी गेलेल्यांना या भासमान जगातून बाहेर काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या मानवी वर्तनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...