आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी दिले निवेदन:धान्याचा काळाबाजार केल्याचा‎ आरोप, परवाना निलंबित‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्त धान्याच्या दुकानाआडून‎ रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार‎ केल्याच्या कारणावरून शेगाव‎ शहरातील श्रावण बहुद्देशीय संस्थेच्या‎ स्वस्त धान्य दुकानाचा परवाना जिल्हा‎ पुरवठा विभागाकडून निलंबित‎ करण्यात आला आहे. हे प्रकरण‎ उजेडात आल्यानंतर जवळपास पाच‎ महिन्याच्या विलंबानंतर पुरवठा‎ विभागाकडून ही कारवाई करण्यात‎ आली. शहरातील दोन मोरी परिसरात‎ शहर पोलिसांच्या डीबी पथकाने १५‎ सप्टेंबर २०२२ रोजी रेशनचा ३०‎ क्विंटल तांदुळ काळ्या बाजारात‎ विक्रीसाठी जात असलेले वाहन‎ पकडले. त्या वाहनात ६० कट्टे तांदूळ‎ मिळून आला. तेव्हा वाहनचालक‎ मो.इकबाल मो.इस्माईल (२५)‎ रा.बाळापूर याची विचारणा केली‎ असता वाहनातील तांदुळ दीपक‎ ढमाळ यांच्या गोदामातून आणला‎ असून, तो अकोला जिल्ह्यातील‎ कसुरा गावात घेऊन जात असल्याचे‎ त्याने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर‎ वाहनामध्ये असलेला ३० क्विंटल‎ तांदुळ रेशनचा आहे का? याबाबत‎ तपासणी करण्यासाठी पोलिसांनी‎ पुरवठा विभागाला पत्र दिले. २१ सप्टेंबर‎ रोजी माहिती मिळाल्यानंतर‎ मो.इक्बालसह दीपक ढमाळ या‎ दोघांविरोधात अत्यावश्यक वस्तू‎ अधिनियम नुसार गुन्हा दाखल‎ करण्यात आला होता. तसेच ढमाळ‎ यांच्या स्वस्त धान्य दुकानाची चौकशी‎ नांदुरा येथील पुरवठा निरीक्षकांनी‎ केली. त्यामध्ये मुख्य आरोपी दिपक‎ ढमाळ यांच्या दुकानात अनेक‎ अनियमितता आढळून आल्या.‎ त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी दीपक‎ ढमाळ चालवित असलेल्या श्रावण‎ बहुद्देशीय संस्थेच्या स्वस्त धान्य‎ दुकानाचा परवाना निलंबित करण्यात‎ आल्याचे शेगाव तहसीलचे पुरवठा‎ अधिकारी बोराडे यांनी सांगितले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...