आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्याची परवानगी द्या: अरबट

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव सुरु झाला असून, आगामी २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव तर ५ ऑक्टोबरला दसरा व ९ ऑक्टोबरच्या ईद निमित्त सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम, देखावे, शोभायात्रांचे आयोजन केले जाते. या सर्व उत्सवांमध्ये डी. जे. वाजवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख गोपाल अरबट पाटील यांनी केली आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, याबाबत तातडीने पावले उचलली जावी, असे त्यात लिहिले आहे. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी अमरावती शहरात ३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डी.जे वाजविता येणार नाही. याशिवाय आंदोलन, घोषणाबाजी, बॅनर लावणे, कॅसेट वाजवणे यावरही प्रतिबंध आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अधिकार वापरून ते शिथिल करावेत, असे गोपाल अरबट पाटील यांच्या निवेदनाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...