आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म-मृत्यूच्या नोंदी:माय अमरावती अॅपवर मालमत्ता करही भरा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेद्वारे निर्मित ‘माय अमरावती’ हे सिटिझन अॅप े बहुपयोगी असून, यात मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा तर आहेच. पण, नागरिकांना तक्रारीही करता येणार असून येत्या काही दिवसांत जन्म-मृत्यूच्या नोंदी बघता येतील अशी सुविधा यात राहणार आहे.

‘माय अमरावती सिटिझन मोबाइल अॅप’ हे कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासोबतच प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान व्हावे. तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आले आहे. “MyAmravati” हे अॅप मनपाद्वारे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले असून, या ‘सिटीझन अॅप’चा वापर करूनही नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता येईल तसेच विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रारीही दाखल करता येतील. एवढेच नव्हे तर काही सुचना असतील तर त्याही देता येतील.

यासह येत्या काही दिवसांत जन्म-मृत्यूच्या नोंदीबाबतही त्यावर पूर्ण माहिती टाकली जाणार असून याच अॅपवर नागरिकांना त्यांच्या जन्माची नोंद व्यवस्थित आहे की, नाही. नावाचे स्पेलिंग, जन्म झालेल्या ठिकाणाची माहिती व्यवस्थित आहे की नाही याबाबत शहानिशा करता येणार आहे. यात अनेक सुविधा टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणार आहेत. याआधीच मनपाद्वारे मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या www.amravaticorporation.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना मालमत्ता कराचा ऑनलाइन भारता येईल. मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याकरता नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीम युपीआय विविध वाॅलेट्स, क्यूआर कोड असे विविध पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर भरल्यानंतर त्यासंदर्भात संदेश, एसएमएस नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर प्राप्त होणार आहे.

आणखी अॅप्लिकेशन्स वाढवणार
माय अमरावती अॅप’ हे जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासोबत कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. तसेच यात जन्म-मृत्यूसह इतरही महत्त्वपूर्ण अॅप्लिकेशन्स वाढवले जाणार आहेत.-अमित डेंगरे, सिस्टिम मॅनेजर, मनपा.

मोबाइलचा वापर वाढल्याने अॅपची निर्मिती
सध्या बहुतेक नागरिकांकडे मोबाइल फोन असून ते सतत जवळ बाळगतात. त्यामुळेच ‘माय अमरावती अॅप’ मनपाने गुगल स्टोअरवर टाकले आहे. या अॅपद्वारे नागरिक कुठूनही मालमत्ता कर भरू शकतात, तक्रार करू शकतात किंवा सूचनाही देऊ शकतात. तसेच त्यांना जर मनपाबाबत कोणतीही माहिती हवी असेल तर तीही त्यांना उपलब्ध होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...