आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:स्कूल बसची रस्त्याच्या बाजूला बँड वाजवणाऱ्या मुलांना धडक, चालकासह पाच जण जखमी, उपस्थितांनी दिला चालकास चोप

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकविरा स्कूलबसने मंगल कार्यालयासमोरील रस्त्याच्या बाजूला बँड वाजवणाऱ्या चार युवकांना जबर धडक दिली. या घटनेत स्कूल बसच्या चालकासह एकूण ५ जण जखमी झाले.

शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर दर्यापूर ते मुर्तीजापुर मार्गावरील वैभव मंगल कार्यालयासमोर आज, मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला.

चालकाचा निष्काळजीपणा

वैभव मंगल कार्यालयात बिनधास्तपणे मंगळवारी लग्न समारंभ सुरू होता. मंडपाबाहेर वर पक्षाकडील अचलपूर येथील बँड पार्टीचे वाजंत्री उभे होते. दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या या बँड पथकावर दर्यापुर एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंटसच्या (एम.एच.२७ ए. ९५२९) स्कूलबसने धडक दिली.

बसमध्ये वीस ते पंचवीस वऱ्हाडीसुध्दा बसले होते. तेही याच मंगल कार्यालयात लग्नासाठी आले होते. परंतु चालकाच्या निष्काळजीपणाणुळे बँड पार्टीतील चार जणांना स्कूल बसने चिरडले.

स्कूलबस चालकाला मारहाण

या घटनेनंतर स्कूलबस चालकाला उपस्थितांनी मारहाण करीत बसवर दगडफेक केली. स्कूल बसच्या अपघातात राजू इंगोले, सुखदेव इंगळे, योगेश अंभोरे, सागर वानखडे व स्कूल बस चालक अशोक कळसकर हे पाच जण जखमी झालेले आहेत.

यातील दोन वाजंत्री हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणेदार संतोष ताले व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले.

स्कुलबस पोलिसांच्या ताब्यात

या अपघातानंतर पोलिसांनी लगेच पंचनामा करीत स्कूलबस ताब्यात घेतली. स्कूलबसचा वाहन परवाना, विमा आदी कागदपत्रे उपलब्ध आहेत की नाही याची पडताळणी सुरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीयाही सुरु आहे, अशी माहिती दर्यापूरचे ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.