आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळाच्या दुषित पाण्यामुळे अंगाला खाज!:सावंगी मग्रापूरात पाणी टंचाई, गढूळ पाण्यावरच भागवली जाते तहान, प्रशासनाला तक्रार

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावंगी मग्रापूर हे वर्षोनुवर्षे पाण्यासाठी तहानलेले गाव अशी या गावाची ओळख झाली आहे. आता याच गावात गढूळ पाणी नळातून येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरी गंभीर बाब म्हणजे या नळ्याच्या पाण्यामुळे अंगाला खाज येण्याचे प्रकार घडत असल्याची बाब गावातील नागरीकांकडून सांगण्यात आली आहे.

तालुक्यातील सावंगी मग्रापूर हे वर्षोनुवर्षे पाण्यासाठी तहानलेले गाव अशी या गावाची ओळख झाली आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठे आंदोलन होऊन संपूर्ण गाव आंदोलनात सहभागी झाले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधी मार्फत अनेक आश्वासने देऊन गावातील घरोघरी नळ दिल्या गेले परंतु त्या नळातून येणारे पाणी गढूळ आहे.

यासंदर्भात अनेक नागरिकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. सध्या उन्हाळ्याला जेमतेम सुरवात झाली असून त्या अगोदरच गावातील महिलांच्या डोक्यावर पाण्याचे भरणे आल्याचे दिसून येत आहे. गावापासून चार ते पाच किमी अंतरावरून गावातील महिलांसह शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यासाठी हातातील पुस्तके सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नळातून येणारे पाणी गढूळ असून त्याचा घाण वास येत असल्याचेही नागरिकांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे तत्काळ निर्मळ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीने अधिग्रहित केलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी खाली गेली असून त्यामुळे पाणी गढूळ येत आहे.ते पाणी पिण्यायोग्य नसल्याबाबत ग्राम पंचायत मार्फत दवंडी देण्यात आली आहे. पाणी टंचाईच्या दृष्टीने लवकरच गावात टँकर सुरू होणार असल्याचे उपसरपंच जोरावर खा पठाण यांचे म्हणणे आहे.

पाण्यामुळे अंगाला खाज

गावात नळावाटे येणारे पाणी हे अत्यंत खराब असून त्याचा वापर आंघोळीसाठी केला असता संपूर्ण आंगाला खाज सुटली. त्यामुळे उपाय न केल्यास चर्मरोग बळावण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर गावात शुद्ध पाण्याचे टँकर सुरू करावे, असे एक निवेदन पुन्हा गटविकास अधिकारी यांना दिल्याचे शेख अनिस उर्फ पहेलवान यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...