आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबा एक्सप्रेस’:नव्या एलएचबी कोचसह आजपासून ‘अंबा एक्सप्रेस’ ; प्रत्येक कोचची लांबी 1.5 मीटरने वाढल्यामुळे झाली 8 जादा बर्थची सुविधा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेसनेही आता कात टाकली असून, मंगळवार, १४ जूनपासून नव्या लाल, पांढऱ्या रूपासह ती रुळावर धावताना दिसणार आहे. त्यामुळे २० प्रशस्त, आरामदायक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोचमध्ये प्रवास करण्याची अमरावतीकर प्रवाशांना प्रथमच संधी मिळणार असून, अनेक वर्षांपासूनचे तेच ते कोचही आता इतिहासजमा होणार आहेत. सोबतच अंबा एक्स्प्रेसचा वेगही वाढणार आहे. अंबा एक्स्प्रेसला लागणारे हे एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित आहेत. एवढेच नव्हे तर मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे अंबा एक्स्प्रेसचा वेगही आधीपेक्षा वाढेल. आधीच्या एका कोचमध्ये ७२ बर्थ असायचे. आता एलएचबी कोचची लांबी ही १.५ मी.ने वाढल्यामुळे ८ बर्थ वाढले असून, एकूण ८० बर्थ राहतील. रुंदी आधीच्याच कोचप्रमाणे १.९ मी. असल्याची माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली. सोमवार, १३ जूनला मुंबईकडे निघालेल्या अंबा एक्स्प्रेसला आयसीएफ अर्थात इंटर्नल कोच फॅक्टरी या पद्धतीचे निळ्या रंगाचे कोच लागले हाेते. हे कोच वजनाने जड असून प्रशस्त नाहीत. त्यामुळे ते पूर्णपणे काढून त्याऐवजी वजनाने हलके व प्रशस्त एलएचबी कोच मंगळवारपासून इंजिनला जोडले जाणार आहेत. यात एसी, स्लीपर व जनरल अशा तिन्ही प्रकारच्या कोचचा समावेश आहे. खराब झालेले जुने कोच बदलण्यात यावे, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती. त्याच अनुषंगाने वेळेनुसार हा बदल केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

एक स्लीपर व जनरल कोच कमी केला एलएचबी कोच प्रशस्त असल्यामुळे अंबा एक्स्प्रेसला एकूण २० कोच लागणार आहेत. आधी ही एक्सप्रेस २२ कोचची होती. परंतु, यातून एक स्लीपर व एक जनरल कोच कमी करण्यात आला आहे.

एलएचबी कोच स्थानकावर दाखल ^एलएचबी कोच अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावर दाखल झाले. १४ जूनला ते अंबा एक्स्प्रेसला जोडले जाणार आहेत. सध्या हे कोच प्लॅटफॉर्म क्र. ३ वर ठेवले आहेत. - एम. एस. लोहकरे, स्टेशन प्रबंधक, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...