आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप कोरोना योद्ध्याला:महामारीत देवदूत ठरणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला...

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा मंत्री, नेता, सामाजिक कार्यकर्ता अशांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्रेत सरकारी अधिकारी, चाहते, कार्यकर्ते यांच्या वाहनांचा मोठा ताफा असतो. ही त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या मोठेपणाची, त्याने केलेल्या कार्याची साक्ष असते.

या कोरोनाकाळात कोरोना योद्ध्यांच्या कार्यालाही तेवढेच महत्त्व आहे. मग, रुग्णवाहिकांचे चालकही अनेकदा देवदूत ठरताहेत. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची अविरत सेवा करणारे रुग्णवाहिका चालक संजय पुनसे यांचा बुधवारी कोरोनानेच बळी घेतला. आपल्या या योद्ध्याला अंतिम निरोप देण्यासाठी ३० पेक्षा अधिक रुग्णवाहिका एका रांगेत निघाल्या. सलामी म्हणून रुग्णवाहिकांचे सायरनही वाजवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...