आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारण अस्पष्ट‎:एसटीच्या आगार व्यवस्थापकाची‎ गळफास घेऊन आत्महत्या,‎ शिवाजीनगर परिसरातील शासकीय निवासस्थानातील घटना

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या अमरावती ‎ ‎आगार व्यवस्थापकांनी गळफास ‎ लावून आत्महत्या केली.‎ शहरातील शिवाजीनगर परिसरात ‎ ‎ त्यांचे शासकीय निवासस्थान होते.‎ याच ठिकाणी त्यांनी आत्महत्या‎ केल्याचे मंगळवारी (दि. २)‎ सकाळी समोर आले.

या घटनेने‎ एसटी महामंडळ कर्मचारी,‎ अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त‎ होत आहे.‎ सुहास पांडुरंग पांडे (४६, रा.‎ शिवाजीनगर, अमरावती) असे‎ आत्महत्या करणाऱ्या आगार‎ ‎ व्यवस्थापकांचे‎ ‎ नाव आहे.‎ ‎ सुहास पांडे‎ ‎ मागील काही‎ ‎ महिन्यांपासून‎ ‎ अमरावती‎ आगारात आगार व्यवस्थापक‎ पदावर कार्यरत होते. ते‎ कुटुंबीयांसह शिवाजीनगर येथे‎ शासकीय निवासस्थानी‎ वास्तव्याला होते.‎

मंगळवारी सकाळी ६‎ वाजताच्या सुमारास घरातील एका‎ खोलीत त्यांनी गळफास लावला‎ असल्याचे समोर आले.‎ कुटुंबातील अन्य सदस्य घरातील‎ दुसऱ्या खोलीत झोपले होते.‎ तत्काळ ही माहिती गाडगेनगर‎ पोलिसांना देण्यात आली.‎ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन‎ पाहणी केली. त्यांना तातडीने इर्विन‎ रुग्णालयात दाखल केले असता‎ डॉक्टरांनी मृत घोषित केले.

त्यांनी‎ आत्महत्या का केली, याबाबत‎ कोणतीही माहिती समोर आली‎ नव्हती.‎ या प्रकरणी गाडगेनगर‎ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची‎ नोंद केली आहे. सुहास पांडे‎ यांच्या पार्थिवावर मंगळवारी‎ सायंकाळी नेरपरसोपंत येथे‎ अंत्यसंस्कार करण्यात आले.‎