आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मै झुकेगा नही':​​​​​​​अमरावतीत बच्चू कडूंचे मोठ-मोठे पोस्टर्स, रवी राणांच्या दिलगिरीनंतरही कार्यकर्ते आक्रमक

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीत आज आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यातच रवी राणा यांच्या आरोपांमुळे शिंदे-फडणवीसांसोबत राहायचे की नाही, याबाबत बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार आहे.

कार्यकर्ते आक्रमक

मात्र, या मेळाव्यात लागलेल्या बच्चू कडूंच्या मोठ-मोठ्या पोस्टर्सची आता जोरदार चर्चा रंगली आहे. मेळाव्यातील बच्चू कडू यांच्या सर्व फोटोंवर 'मै झुकेगा नाही', हा पुष्पा सिनेमाचा फेमस डॉयलॉग लावण्यात आला आहे. त्यामुळे रवी राणा यांनी बच्चू कडूंबद्दलचे शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली असली तरी कार्यकर्ते मात्र अजूनही आक्रमक असल्याचे दिसून येत आहे.

अमरावतीत शक्तिप्रदर्शन

आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने बच्चू कडूही अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांत चीड

मेळाव्याआधी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, रवी राणा यांच्या आरोपांमुळे कार्यकर्त्यांत प्रचंड चीड आहे. गेल्या 30-35 वर्षांतील राजकीय कारकिर्दीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळेच कार्यकर्ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहे. पुढे काय करायचे, याचा अंतिम निर्णय कार्यकर्तेच घेतील. काही वेळातच सर्व काही स्पष्ट होईल.

मंत्रिपदाबाबत शिंदेंनाच विचारा

आपल्याला मंत्रिपद मिळेल की नाही, यावरही बच्चू कडू यांनी भाष्य केले. बच्चू कडू म्हणाले, मला मंत्रिपद मिळेल की नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अवलंबून आहे. त्यावर मी काही बोलू शकत नाही. तसेच, राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या सुनावणीबाबत बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आहे. त्यांच्या बाजूने बहुमत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदेंच्याच बाजूने लागेल, असा विश्वास आहे.

बातम्या आणखी आहेत...