आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती जिल्ह्यातील वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकारमहर्षी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, खासदार डॉ अनिल बोंडे व पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत "सहकार पॅनल"ने बाजी मारली. या पॅनलचे १८ पैकी १५ उमेदवार विजयी झाले.
कोणाला किती जागा?
गेल्या १० वर्षांपासून बाजार समितीवर असलेली सत्ता कायम ठेवण्यात या गटाला यश मिळाले. त्याचवेळी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार व जिल्हा परिषदेचे माजी सभापती गिरिश कराळे यांच्या "शेतकरी पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या.
या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून वनराज कराळे, अमित कुबडे, मुकेश देशमुख, सुजित पाटील, नरेंद्र पावडे, बाबाराव मांगुळकर, बाबाराव लोखंडे तर सेवा सहकारी संस्था महिला मतदार संघातून रोषणी मानकर, अर्चना मुरुमकर विजयी झाल्या. सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून अंकुश पाटील, याच संवर्गातील विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून प्रणय सोंडे विजयी झाले.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल मतदार संघातून प्रवीण मानकर, व्यापारी व अडते मतदार संघातून राजेंद्र गांधी, जाबीर खान जहागीर खान उर्फ जाबुभाई तर हमाल व मापारी मतदार संघातून नरेंद्र पांडव असे "सहकार पॅनलचे" एकूण १५ उमेदवार विजयी झाले.
शेतकरी पॅनलतर्फे ग्रामपंचायत मतदारसंघातून प्रमोद पाटील, हिराकांत उईके व प्रंशात बहुरुपी या तीन उमेदवारांचा विजय झाला. विजयी सर्व उमेदवारांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून या निवडणुकीत सहकार पॅनलच्या विजयाने विक्रम ठाकरे परिवारामध्ये आनंद निर्माण झाला असून सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाचा गजरात गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. यावेळी गावोगावहून आलेले विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.