आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोट उलटून 11 जण बुडाले होते:तब्बल 48 तासांनी सापडले वर्धा नदीपात्रात बुडालेल्या 7 जणांचे मृतदेह, एक व्यक्ती अजूनही बेपत्ता; 3 मृतदेह मंगळवारीच काढले होते

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी सकाळी ही घडना घडली होती.

वरुड (अमरावती) तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव अलटून एकाच कुटुंबातील एकूण 11 जण पाण्यात बुडाले होते. यापैकी तिघांचे मृतदेह हे मंगळवारीच बाहेर काढण्यात आले होते. तर उर्वरीत 8 जणांचा शोध सुरू होता. त्यापैकी सात मृतदेह तब्बल 48 तासांनंतर मिळाले आहेत. तर एक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे.

मंगळवारी सकाळी ही घडना घडली होती. एकाच कुटुंबातील 11 जण दशक्रिया विधीसाठी आलेले होते. दरम्यान सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळवारी फिरायला गेले होते यावेळी ही घटना घडली होती. नाव उलटून अख्खे कुटुंब पाण्याखाली गेले होते.

वर्धा नदी पात्रात बुडून झालेल्या अपघातातील सात मृतदेह आज (दि.16) बाहेर काढण्यात आले आहे. तब्बल 48 तासाने म्हणजेच तिसऱ्या दिवशी सात मृतदेहांचा शोध लागला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे. त्या व्यक्तीचा नदीपात्रात शोध सुरू आहे.

आज सापडलेल्या सात पैकी सहा जणांची नावे

पियुष मटरे (10) निशा मटरे (22 ) वृषाली वाघमारे (19) अतुल वाघमारे ( 25 ) अश्विनी खंडारे (21) पुनम शिवणकर (31 )

वरुड तालुक्यातील होते कुटुंब
हे सर्व व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गडेगाव येथील होते. प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. सोमवार दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवार सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या 11 जणांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...