आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीमध्ये अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावर महाराष्ट्र दिनी सायंकाळी पाचच्या सुमारास दर्यापूरकडून अंजनगावकडे येणाऱ्या (एम एस २७ डिई २५५४) बलेनो कंपनीच्या चालत्या कारला अचानक आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच वाहनात बसलेले मालक पुरुषोत्तम दातीर रा. अंजनगावसुर्जी व त्यांचा भाचा हिमांशू भावे यांनी चिंचोली फाट्यावर कार थांबवली आणि ते लगेच गाडी खाली उतरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर लगेच अंजनगावसुर्जी येथील अग्निशामक दलाला कळविण्यात आले. परंतु अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत बलेनो कार जळून खाक झाली होती.
जीवित हानी टळली
वाहनात बसलेल्यांच्या सतर्कमुळे कुठलीही जीवित हानी झाली नसून कार मात्र जळून खाक झाली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीही हानी होऊ नये याकरिता अतोनात प्रयत्न केले. फायरमन अरुण माकोडे, गौरव इंगळे, आशिष वडाखरे, अखिलेश खाडे यांचा आग विझविणाऱ्यांमध्ये समावेश होता. दरम्यान रहिमापूरचे ठाणेदार निलेश देशमुख यांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी व कुठलीही दुर्घटना होऊ नये याकरिता चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.