आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगर पालिकेच्या मनुष्यबळ पुरवठा कंत्राटाची माळ स्थानिक अमरावती नागरिक सेवा सहकारी संस्थेच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादालाही तिलांजली मिळाली आहे.विक्रमी २७ कोटीचे तीन वर्षांसाठी असलेले मनुष्यबळाचे हे कंत्राट आपल्याला मिळावे, यासाठी इटकाॅन्सने जोरदार प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली आहे. निविदा काढण्यात आल्यानंतर देशभरातून सुमारे ९१ एजन्सींनी हे कंत्राट मिळविण्यासाठी दावेदारी केली होती. त्यापैकी तांत्रिक फेरीत ९ एजन्सी पात्र ठरल्या. त्यात अमरावती नागरिक सेवा सहकारी संस्थेचाही समावेश होता.
तसेच इटकाॅन्सही शर्यतीत होती. मात्र, फायनान्शियल बीडमध्ये अमरावती सेवा सहकारी संस्था ही ‘एल वन’ ठरली. मनुष्यबळ पुरवठा कंत्राटाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत मनपा वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच या आठवड्यात हे काम मार्गी लागणार, असे मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी संकेत दिले होते. त्यानुसार आता हे काम मार्गी लागले आहे. कंत्राट मिळवण्यासाठी मनपा प्रशासनावर चांगलेच राजकीय दडपण आणले गेले. परंतु, त्याचा फारकाही उपयोग झाला नाही. स्थानिक संस्थेच्या गळ्यात ही माळ पडली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.