आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Amravati City's Baba Corner Chowfuli Is Inviting Accidents; Traffic Congestion Is Caused By Vehicles Coming In The Opposite Direction| Marathi News

अपघाताच्या घटना:अमरावती शहरातील बाबा काॅर्नर चौफुली देत आहे अपघाताला निमंत्रण; विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे होते वाहतुकीची कोंडी

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) ते पंचवटी चौक मार्गावरील बाबा कॉर्नर या चौफुलीवरून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक ये जा करतात. मात्र, या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने बाबा कॉर्नर चौफुली अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे संबंधित विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.शहरातील बाबा कॉर्नर चौफुली परिसरात विविध विद्यालये, शाळा, त्याच सोबत फेरीवाल्यांच्या खाद्य पदार्थांच्या गाड्या येथे सकाळ पासून लावण्यात येतात. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांची गर्दी असते.

तसेच गर्ल्स हायस्कूल चौकाकडून येणाऱ्यांना याच मार्गावरून वळण घ्यावे लागते. त्याच सोबत गाडगे नगर, पंचवटी चौकातून येणारी वाहतूक तसेच रामपुरी कॅम्प कडे जाणारी वाहतूक याच चौफुलीवरून सुरू असते. यावेळी वाहन चालक विरुद्ध बाजूनी वाहन टाकतात. सतत च्या वर्दळीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी सुद्धा किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. सततच्या वाहतुकीमुळे बाबा कॉर्नर नजीक वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहतूक पोलिस या मार्गावर तैनात असूनही बरेचदा वाहन धारकांकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन धारक मनमानी पद्धतीने या मार्गावरून ये जा करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...