आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मागील चार ते पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज (दि. १३) पारा विक्रमी ४४.६ अंशावर पोहोचला होता. सकाळी दहा वाजतापासूनच आज सूर्य अक्षरश: आग ओकत होता. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्ते निर्मण्युष्य दिसत होते. आगामी दोन ते तीन दिवसात पारा ४५ अंशाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
एप्रिल महिन्यात सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात ४ ते ५ मेपर्यंत फार उकाळा नव्हता. पारा ३९ ते ४० अंशापर्यंत स्थिरावला होता. मात्र ६ मे पासून दरदिवशी तापमानात वाढ सुरू आहे. मात्र गुरूवारपासून (दि. ११) तर पारा प्रचंड झपाट्याने वर चढत होता. शुक्रवारी शहरात ४३ अंशाच्या आसपास होता. तेच शनिवारी एकदम पारा ४४.६ अंशावर गेला. एकाचदिवशी सुमारे १.६ अंशाने वाढ झाल्यामुळे शनिवारी दिवसभर उन्हाची दाहकता चांगलीच जाणवत होती. दुपारच्यावेळी दुचाकीवर अक्षरश: चटके जाणवत होते. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे असह्य उकाडा शनिवारी अमरावतीकरांनी अनुभवला.
तापमान वाढणार
जिल्ह्यावर मागील सहा दिवसांपूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात बाष्पाचा परिणाम होता. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून बाष्प मोचा चक्रीवादळाच्या दिशेने वळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळेच तापमानात वाढ झाली असून, आगामी दोन ते तीनच दिवसात पारा ४५ अंश ओलांडणार आहे. डॉ. सचिन मुंढे, कृषी हवामान शास्त्रज्ञ.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.