आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावतीत कोरोना सुसाट:दिवसभरामध्ये 727 रुग्णसंख्येचा नकोसा विक्रम; 7 बाधितांचा मृत्यू

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज दळणवळण बंद; कंटेनमेंट झोनची चाचपणी सुरू

गेल्या आठवडाभरापासून अगदी सुसाट धावणारा कोरोना थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी पुन्हा ७२७ ही विक्रमी संख्या बाहेर आली आहे. या नव्या संख्येमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ८१५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात सात जणांचा मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री ८ वाजेपासून ३६ तासांचा लॉकडाऊन सुरु झाला असून, उद्या, रविवारी संपूर्ण दिवसभर दळणवळण बंद राहणार आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या जास्त असलेल्या परिसरांची चाचपणी सुुरु झाली असून उद्या त्या भागात कन्टोन्मेंट झोनही तयार केले जाणार आहे.

मास्क न वापरणाऱ्यांवर दंड ठोठावण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली असून, रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा शाबूत ठेवणे, नवी रुग्णालये व केअर सेंटरची उभारणी, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यावर भर ही पावलेही यापूर्वीच उचलण्यात आली आहेत. शासकीय सुटी असतानाही आज, शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहरातील धर्मगुरुंची बैठक घेतली. मस्जीदमधील नमाज, चर्चमधील प्रार्थना आणि मंदिरांमधील रोजची आरती आदी धर्मकार्ये विनागर्दीची करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

गेल्या चोवीस तासांत मृत झालेल्यांमध्ये स्थानिक अर्जुननगर येथील ६६ वर्षीय पुरुष, छांगाणीनगर येथील ७९ वर्षीय पुरुष, अंबापेठ येथील ८४ वर्षीय पुरुष, आनंदविहार कॉलनीतील (व्हीएमव्ही रोड) ३३ वर्षीय तरुण, पंचवटी कॉलनीतील ५८ वर्षीय पुरुष, डोंगरयावली (ता. मोर्शी) येथील ८० वर्षीय पुरुष आणि स्थानिक दीपनगर स्थित ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यापैकी अर्जुननगरच्या रुग्णावर सिटी हॉस्पीटलमध्ये तर छांगाणीनगरातील रुग्णावर महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होता. इतर पाच जणांचा मृत्यू जिल्हा कोविड रुग्णालयात झाला असून गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होता, असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. आजच्या सात मृत्यूंमुळे जिल्ह्यातील एकूण मृत कोरोनाबाधितांची संख्या ४६० वर पोहोचली आहे.

शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात बाधित आणि मृत्यूची संख्या वाढत असल्यामुळे शनिवारी रात्रीपासून प्रवासालाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रात्री ८ नंतर खासगी ट्रॅव्हल्स अथवा एसटी बसेसला शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. ही प्रवेशबंदी सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहील. वैद्यकीय कारणास्तव केला जाणारा प्रवास, अॅम्बुलन्स, अग्निशमन दलाची वाहने आणि कोविड-१९ च्या नियंंत्रणार्थ कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाहनेच केवळ रस्त्याने ये-जा करु शकतील. दरम्यान, घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेला भाजीपाला, औषधी, दूध-दही, किराणा यासाठी सकाळी विशिष्ट वेळांत सामान्य नागरिकांनाही बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत धर्मगुरुंच्या बैठकीला यांची होती उपस्थितीधर्मगुरुंच्या बैठकीला साईनगर स्थित साईबाबा ट्रस्टचे पदाधिकारी शरद दातेराव, िबशप हाऊसचे फादर जोसलीन, अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे, साबणपुऱ्यातील जामा मस्जीद समितीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद शकील हाजी शेख अहमद साहब, जमीयत-ए-उलेमाचे सदर हाफीज नाजीम अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रार्थनास्थळांवर गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे अभिवचन त्यांच्याद्वारे देण्यात आले. आरती, प्रार्थना, नमाज किंवा इतर धर्मकार्यासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत. फारच गरजेच्या अनुष्ठानासाठी एकेका भक्त/श्रद्धाळूला प्रवेश दिला जाईल, असेही या धर्मगुरुंनी मान्य केले आहे.शहरात ९ कंटेनमेंट झोनची घोषणाशहरात ज्या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग आहे, अशा ९ परिसरांमध्ये महानगर पालिकेद्वारे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. त्यात श्रीकृष्ण पेठ, सबनीस प्लाॅट, महाजनपुरा, एलआयसी काॅलनी, भाजी बाजार, सद्गुरूधाम काॅलनीजवळ अनुराधा नगर, महेशनगरजवळ चंद्रावती नगर, भारत नगर, द्वारकानगरजवळ उषा काॅलनी आणि गोकुल उदय काॅलनीजवळ साईनगर खंडेश्वर काॅलनीचा समावेश आहे.खासगी रुग्णालयातील रॅपिड अॅन्टीजन चाचणी बंदखासगी रुग्णायातील ओपीडीमध्ये रॅपिड अॅन्टीजन चाचणी बंद करण्यात आली असून, केवळ आरटीपीसीआर चाचणीच यापुढे करावी लागणार आहे. खासगी हाॅस्पिटल व दवाखान्यात मोठया प्रमाणात अॅन्टीजन चाचणी करून रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात होते. शहरात कोरोना संसर्ग वाढण्याचे हे देखील एक कारण असल्यामुळे ही चाचणी बंद करण्यात आली आहे.खासगी कोविड हाॅस्पिटलमधील आेपीडी हाऊसफुलकोरोना संसर्गाचा सुसाट वेग असल्यामुळे शहरातील बहुतांश खासगी कोविड हाॅस्पीटल्स सध्या हाऊसफुल झाले आहेत. सर्वच रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी मोठी गर्दी उसळली असून इतर आजाराच्या रुग्णांना गंभीर स्थितीत दाखल करणे सध्या फारच अडचणीचे झाले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये कोविड हाॅस्पीटल सुरू करण्याची प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महेश भवन येथे पुन्हा कोविड हाॅस्पीटल सुरू करण्यात आले आहे.

विवाहासाठी फक्त २० व्यक्तींचीच अट

जिल्ह्यात शनिवार रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. या कालावधीत पूर्व नियोजित लग्न समारंभ पार पडण्यासाठी फक्त २० उपस्थितीतीच मुभा देण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत आदेश जारी केला त्यानुसार संचारबंदीच्या काळात लग्न समारंभाचे यापूर्वीच नियोजन केलेल्यांना २० लोकांच्या उपस्थितीमध्येच समारंभ पाडता येईल.िवशेष असे की या काळात वधू-वर पक्षाला मिरवणूक काढता येणार नाही. लग्न समारंभाला परवानगी देणे आवश्यक वाटत असल्यास परवानगी प्राधिकारी म्हणून महापालिकेत उपायुक्व तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

धर्मगुरु व टास्क फोर्सच्या बैठकीत प्रार्थनास्थळांवरील गर्दी नियंत्राचा निर्णय

शनिवारी दिवसभरात काही भागांची पाहणी केली असून, धर्मगुरु व टास्क फोर्सच्या सदस्यांबोबत बैठक घेतली. बैठकीत प्रार्थनास्थळांवरील गर्दी नियंत्रीत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला उपस्थित धर्मगुरुंनीही याबाबीला प्राथमिकता देण्याचे मान्य केले असून, ते सर्वजण या मुद्द्याशी सहमत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ३६ तासांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून. परिस्थितीनुरुप भविष्यात इतर निर्णय घ्यावे लागणार आहेत. तूर्त नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असून. कायदा न मोडणे व दंडात्मक कारवाई करावी लागेल, असे वर्तन न करणे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मास्क, सुरक्षीत अंतर व सॅनिटायझरचा वापर ही त्रिसूत्री पाळणेही आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.