आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचे थैमान:अमरावतीत दिवसभरात आढळले सर्वाधिक 926 पॉझिटिव्ह, तर 6 रुग्णांचा मृत्यू

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही ठिकाणी गर्दी तर काही ठिकाणी शुकशुकाट; रस्त्यांवर, हाॅकर्सजवळ, दुकानातही फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

जिल्ह्यात कोरोना गेले दोन आठवडे सुसाट सुटला हाेता. मंगळवारी (दि.२३) तर सर्वसामान्यांचा थरकाप उडवणारा ब्लास्टच झाला आहे. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक ९२६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाद्वारे केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह िनर्माण झाले आहे. रस्ते, बाजार गर्दीने गजबजत आहेत. प्रशासनाने उशिरा उपाययोजना सुरू केल्याचाच हा परिणाम असल्याचे मत शहरातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे. एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने ३१ हजार १२३ झाली आहे. आता मृत रुग्णांची संख्याही वाढायला लागली असून आज ६ जण कोरोनाचे बळी ठरले. यात फ्रेजरपुरा अमरावती येथील ७३ वर्षीय महिला, आशियाड काॅलनी येथील ६३ वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी येथील ४४ वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील ६५ वर्षीय पुरुष वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील ६५ वर्षीय पुरुष, तसेच आर्वी येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण मृतकांची संख्या ही ७७१ वर पोहोचली.

मंगळवारी ३५९ रुग्णांना विविध रुग्णालयांमधून सुटी झाली. त्यामुळे कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांची संख्या २६ हजार ७५८ झाली आहे. तसेच १०९७ रुग्ण सध्या हाॅस्पिटलमध्ये दाखल आहेत. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ३ हजार ८९४ वर पोहोचली अाहे.

काेरोना संसर्गाचा विस्फोट झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलत मंगळवारपासून (दि.२३) लाॅकडाऊन सुरू केले. सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी सुट देण्यात आली. या संधीचा लाभ घेत काही गरजू खरेच बाहेर पडले तर अनेकजण विनाकारण घराबाहेर पडल्याचे चित्र िदसत होते. काही ठिकाणी गर्दी तर काही ठिकाणी शुकशुकाट अशी स्थिती हाेती. रस्त्यांवर, हाॅकर्सजवळ व दुकानातही फिजिकल डिस्टन्सिंगचा पुन्हा फज्जा उडाल्याची चित्र होते. त्यामुळे पहिल्या िदवशी लाॅकडाऊनला संमिश्र प्रतिसाद िमळाल्याचे िदसून आले. विशेष बाब अशी की, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँकांमध्ये आज १५ टक्के उपस्थिती होती. तसेच मोजक्याच नागरिकांना कामानिमित्त आत सोडले जात होते. मात्र जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीच आज शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी िदसून आली. यात ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. शहरातील राजकमल चौक, राजापेठ, नवाथे, जयस्तंभ चौक, इर्विन चौकासह शहरातील इतर भागात काहीशी गर्दी दु. ३ पुर्वी िदसून आली. मात्र दु. ३ नंतर या सर्वच मुख्य चौकांसह ज्या ठिकाणी गर्दी होते अशा सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट िदसून आला. औषधांची दुकाने व खासगी दवाखान्यांमध्ये सायंकाळी काहीशी गर्दी होती.

अंजनगावात लग्नाच्या आयोजकांना दंड

अंजनगाव सुर्जी येथे लग्नाच्या स्वागत समारंभात चांगलीच गर्दी केल्याचे आढळून आल्याने तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत आयोजकांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तसेच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कोरोना साथीच्या काळात मास्कचा वापर व इतर नियम न पाळून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींविरोध कठोर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय व तहसील यंत्रणेकडून पोलीस व नगरपरिषदेच्या समन्वयातून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभासाठी वधू- वरासह केवळ २५ उपस्थितांना परवानगी आहे. अंजनगाव सुर्जी येथील गोविंदनगरातील दिवाणी कोर्टामागील परिसरात अयुब खान युसुफ खान यांच्या घरी लग्नाचे रिसेप्शन सुरू होते. तिथे २५ पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्याने खान यांना २५ हजार दंड ठोठावून तो तत्काळ वसूलही करण्यात आला. या कारवाईत जाहिद खान युनुस खान यांच्यावरही कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, मुख्याधिकारी सुमेध अलोणे व ठाणेदार राजेश राठोड यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून ही कारवाई केली आहे .

बातम्या आणखी आहेत...