आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा हाहाकार:कोरोनाचे दिवसभरात 19 बळी, 704 रुग्ण; मृतकांपैकी 14 जणांचा मृत्यू जिल्हा कोविड रुग्णालयात; संसर्गाचा धोका वाढला

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता 28 कोविड रुग्णालयातच उपलब्ध होणार

कोरोनाने मागील दहा ते बारा दिवसांपासून हाहाकार उडाला आहे. दरदिवशी थरकाप उडवणारे मृतकांचे आकडे समोर येत आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने १९ जणांचे बळी घेतले आहेत. त्यापैकी १४ जण जिल्ह्यातील असून, पाच जण इतर जिल्ह्यातून शहरात उपचारासाठी दाखल झाले होते. याचवेळी मागील २४ तासात नवीन ७०४ पॉझिटिव्ह समोर आले आहे. वाढत असलेली ही रुग्ण व मृत्यूसंख्या प्रचंड धक्कादायक आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात नव्याने ७०४ बाधित समोर आले आहेत तसेच चोवीस तासात जिल्ह्यात विवीध रुग्णालयात एकूण १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ मृत्यू जिल्ह्यामधील तर पाच जिल्ह्याबाहेरील आहे. दरम्यान एकूण १९ मृत्यूंपैकी तब्बल १४ मृत्यू हे एकट्या जिल्हा कोविड रुग्णालयात झाले आहे. जिल्हा कोविड रुग्णालय हे जिल्ह्यातील कोविड उपचाराचे सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे, त्याच रुग्णालयातील हा मृतकांचा आकडा घाबरवणाराच असल्याची चर्चा आज सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान शुक्रवारीसुद्धा एकूण मृत्यू झालेल्या २२ मृतकांपैकी १५ रुग्णांचा मृत्यू हा जिल्हा कोविड रुग्णालयात झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार अद्याप कमी झालेला नाही.

२५ टक्के चाचण्या २४ तासांत पॉझिटिव्ह
मागील २४ तासात जिल्ह्यात आरटीपीसीआर तसेच अॅन्टिजन या माध्यमातून २ हजार ७८० संशयितांच्या चाचण्या केल्या होत्या, याच चाचणींपैक२५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दर दिवशी ही टक्केवारी झपाट्याने वाढत आहे, यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला लॉकडाऊन निष्प्रभ ठरत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

मृतकांमध्ये यांचा आहे समावेश
दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये चांदूर बाजार येथील ७० वर्षीय,आदर्शनगरमधील ६० वर्षीय, भानखेडा खुर्द येथील ६८ वर्षीय पुरूष तर अशोक कॉलनी येथील ६० वर्षीय महिला, अंबिकानगर ७० वर्षीय महिला, चादूर रेल्वे ३९ वर्षीय पुरूष, उतखेड येथील ६० वर्षीय पुरूष, लोणी ६० वर्षीय पुरूष, अमरावती येथील ६५ वर्षीय महिला, राजुरा, वरुड येथील ७५ वर्षीय पुरूष, वरुड ५० वर्षीय पुरूष, यशोदानगर ५५ वर्षीय पुरूष, आर्वी येथील ६० वर्षीय पुरूष तसेच साईखेडा मध्य प्रदेश येथील ६८ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . नागपूर येथील ६२ वर्षीय पुरूषाचा पीडीएमसी, दर्यापूरातील एकता रुग्णालयात नागपूरातील ५१ वर्षीय, राजुरा येथील महिलेचा पीडीएमसीत मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...