आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंदाधुंदी:सुपर स्पेशालिटीत दाखल कोविड रुग्णाचा बाहेर आढळला मृतदेह; रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ; 24 तासानंतर पोलिसांना माहिती

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतकांचा आकडा हजारच्या उंबरठ्यावर 685 नवे पॉझिटिव्ह; 21 जणांचा मृत्यू

येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेला एक ६५ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शनिवारी (दि. २४) सकाळी परस्परच रुग्णालयातून बाहेर पडला. दरम्यान, या रुग्णाचा मृतदेह सुपर स्पेशालिटीपासून जवळच असलेल्या भीमनगर परिसरात आढळला होता. पोलिसांनी बेवारस म्हणून हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन गृहात ठेवला. या रुग्णाचे नातेवाईक शनिवारी दुपारी रुग्णालयात गेले असता त्यांनी रुग्णालयात चौकशी केली असता त्यांच्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. वास्तविकता हा रुग्ण तत्पूर्वीच बाहेर पडून मृत झाला होता. रविवारी (दि. २५) नातेवाइक रुग्णालयात पोहोचले असता त्यांना बाहेरून कळाले की, त्यांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने चांगलीच खळबळ उडाली.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील ७० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा कोविड रुग्णालय म्हणजेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी या रुग्णावर उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास हा रुग्ण परस्परच सुपर स्पेशालीटी रुग्णालयातून बाहेर पडला. जिल्ह्यात सध्या सुरू असलेला कोरोनाचा हाहाकार लक्षात घेता या रुग्णालयात सद्यस्थितीत सुमारे साडेतीनशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या गर्दीतून हा वृद्ध कधी बाहेर पडला, ही बाब रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्याही लक्षात आले नाही. दरम्यान, बाहेर आल्यानंतर हा रुग्ण परिसरातील भीमनगर भागात पोहचला व याच भागात तो रुग्ण मृत झाला.

पोलिसांनी बेवारस म्हणून शवविच्छेदनगृहात ठेवला कोविड रुग्णाचा मृतदेह
बेवारस मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस शनिवारी भीमनगर भागात पोहोचले. सर्वसामान्य मृतदेहाप्रमाणे त्यांनी पंचनामा व इतर सोपस्कार पूर्ण करुन मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवला होता. त्यामुळे घटनास्थळी गेलेले पोलिस व मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या नागरिकांनाही आता धक्का बसला.

न सांगताच निघून गेला कोविड रुग्ण
जिल्हा कोविड रुग्णालयातून न सांगताच सामान्य वार्डातील कोविड रुग्ण निघून गेला. ज्यावेळी तो जागेवर नसल्याचे कळले, त्यावेळी त्याची शोधाशोध करण्यात आली. मात्र शोध लागला नाही. त्यानंतर पोलीसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. डाॅ. श्रीकांत फुटाणे, व्यवस्थापक, जिल्हा कोविड रुग्णालय, अमरावती

आम्ही रुग्ण बेपत्ताची तत्काळ पोलिसांना माहिती दिली
सदर रुग्ण रुग्णालयातून निघून गेल्याची बाब लक्षात येताच आम्ही तत्काळ पोलिसांना माहिती दिली आहे. त्या रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगता येणार नाही. डाॅ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकीत्सक, अमरावती.

नातेवाईक ठाण्यात आले मात्र तक्रार दिली नाही
या रुग्णाचे नातेवाइक रविवारी ठाण्यात आले होते मात्र त्यांनी तक्रार दिली नाही. सुपर स्पेशालिटी प्रशासनाकडून आम्हाला रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा रुग्ण बेपत्ता असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. आम्ही शनिवारीच या रुग्णाच्या मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आसाराम चोरमले, ठाणेदार

मृतकांचा आकडा हजारच्या उंबरठ्यावर ६८५ नवे पॉझिटिव्ह; २१ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात रविवारी २१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत झालेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९७९ झाली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांत ६८५ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण कोरोनाबाधीतांचा आकडा ६१ हजार १६५ वर पोहोचला आहे. रविवारच्या मृतांमध्ये ५५ वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर, ६२ वर्षीय महिला, आष्टी, वर्धा, ६० वर्षीय महिला, अंजनगाव, ६० वर्षीय पुरुष, थडीपोहनी, ७० वर्षीय पुरुष, भारवाडी, तिवसा, ६५ वर्षीय पुरुष, माणिकवाडा, ३५ वर्षीय पुरुष, शेंदूरजना घाट, वरुड, ५० वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर, ५३ वर्षीय पुरुष, डोंगरगाव, ३६, वर्षीय महिला, छिंदवाडा, ५३ वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे, ३६ वर्षीय पुरुष, टेलिकॉम कॉलनी, अमरावती, ७५ वर्षीय महिला, अर्जुन नगर, ३८ वर्षीय पुरुष,

बातम्या आणखी आहेत...