आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकाचे पाऊल:दोन मुलांना दुधातून विषारी औषध‎ देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न, ‎घरगुती वादातून टोकाचा निर्णय

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका‎ ३५ वर्षीय महिलेने ११ वर्षीय मुलीसह‎ सहा वर्षाच्या मुलाला दूधातून उंदीर‎ मारण्याचे औषध दिले. त्यानंतर‎ स्वत:ही विषारी औषध घेऊन‎ आत्महत्येचा प्रयत्न केला.

ही‎ खळबळजनक घटना गुरूवारी (दि.‎ ११) सकाळच्या सुमारास घडली. या‎ तिघांनाही उपचारासाठी शहरातील‎ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल‎ केले असून, त्यांची प्रकृती तूर्तास‎ स्थिर असल्याचे सांगण्यात आले‎ आहे.‎

नक्की काय घडले?

३५ वर्षीय महिलेने गुरूवारी‎ सकाळी मुलगी व मुलाला दूध दिले.‎ या दुधात ‘बोर्नविटा’ टाकले तसेच ‎सोबतच उंदीर मारण्याचे ‘रॅट किल्ड’मिसळले. हे मिश्रण दूधातून‎ गेल्यामुळे मुलांना विषबाधा झाली.‎ तसेच मुलांना विष दिल्यानंतर त्या ‎महिलेने स्वत:ही विष घेतले. त्यामुळे‎ दोन मुलांसह तीसुद्धा अत्यवस्थ‎ झाली.

ही बाब लक्षात येताच‎ ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जिल्हा‎ सामान्य रुग्णालयात दाखल केले.‎ सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य‎ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‎ घरगुती वादाच्या कारणावरुन त्या‎ महिलेने हा निर्णय घेतल्याचे कुऱ्हा‎ ठाण्याच्या ठाणेदार गीता तांगडे यांनी‎ सांगितले.‎