आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:लायब्ररी चौकात चाकूने‎ भोसकून तरुणाचा खून‎, जुन्या वादाचा वचपा; मारेकऱ्यासह 6 जणांना अटक

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीतील लायब्ररी चौकात राहणाऱ्या‎ एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने‎ भोसकून बुधवारी (दि. १०) उशिरा‎ रात्री साडेबारा वाजता खून झाला.‎ या प्रकरणी पोलिसांनी मुख्य‎ मारेकऱ्यासह सहा जणांना अटक‎ केली आहे.

मृत तरुणाने सहा‎ महिन्यांपूर्वी मुख्य मारेकऱ्याच्या‎ लहान भावावर जीवघेणा हल्ला‎ चढवून त्याला जखमी केले होते.‎ त्याच हल्ल्याच्या सुडातून तरुणाचा‎ खून झाला असल्याचे फ्रेजरपुरा‎ पोलिसांनी सांगितले.‎

निखिल राजेश तिरथकर (२३,‎ रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा,‎ अमरावती) असे मृताचे तर देवा ‎ ‎ रामअधार जयस्वाल (२६) असे‎ मुख्य मारेकऱ्याचे नाव आहे. देवा‎ जयस्वालसह विजय किसनलाल‎ मंडले (३९), शक्ति प्रवीण वाघमारे‎ (२७), करण श्याम मंडले (२४),‎ विशाल पवन मंडले (२३) आणि‎ शुभम प्रकाश परिवाले (२४, सर्व रा.‎ फ्रेजरपुरा) या सहा जणांना पोलिस‎ आयुक्तांच्या विशेष पथकाच्या‎ मदतीने फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी‎ पहाटेपर्यंत अटक केली.

नक्की घडले काय?

निखिल‎ तिरथकर याने ऑक्टोबर २०२२ मध्ये देवा जयस्वालच्या लहान‎ भावावर चाकूने वार करुन त्याच्यावर‎ प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यावेळी‎ निखिल तिरथकरविरुद्ध फ्रेजरपुरा पाेलिसांनी‎ प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल‎ केला होता. त्याचवेळी पासून देवा जयस्वाल‎ आणि निखिल तिरथकर यांच्यात ‘खुन्नस’‎ होती.

दरम्यान, बुधवारी रात्री साडेदहा ते‎ अकरा वाजेच्या सुमारास लायब्ररी चौक,‎ फ्रेजरपुरा परिसरात शक्ति वाघमारेचा त्याच्या‎ घराच्या आजूबाजूने राहणाऱ्या एका‎ व्यक्तीसोबत वाद झाला होता. ते भांडण‎ चांगलेच वाढले होते. दरम्यान या वादात‎ निखिल तिरथकरने मध्यस्थी केली होती. तसेच‎ हा वाद झाल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना‎ मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार गाेरखनाथ‎ जाधव यांच्यासह पोलिस ताफा फ्रेजरपुरा‎ चौकात पोहोचला होता.

चाकूने भोसकले

पोलिसांनी भांडण‎ करणाऱ्यांसह जमलेल्या लोकांना घरात‎ पाठवले. त्यावेळी शक्ती आणि निखिल हे सुद्धा‎ आपआपल्या घरात निघून गेले होते. दरम्यान,‎ पोलिस त्याच चौकात हजर असताना सुमारे‎ शंभर ते दीडशे मीटर अंतरावरील एका गल्लीत‎ निखिल तिरथकर गेला असता देवा जयस्वाल,‎ शक्ती वाघमारे व इतर चौघे असे एकूण सहा‎ जणांनी मिळून निखिलला अडवले. त्यावेळी‎ देवा जयस्वालने निखिलच्या दोन्ही मांडीवर‎ चाकूचे घाव केले. त्यानंतर मारेकरी‎ घटनास्थळावरुन पसार झाले. त्याचवेळी‎ चौकात उभे असलेल्या पोलिसांना माहिती‎ पडताच पोलिसांनी गल्लीत धाव घेतली तर‎ निखिल तिरथकर हा रक्तबंबाळ स्थितीत पडून‎ होता.

त्याला तत्काळ पोलिस वाहनातून‎ इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. उपचार‎ सुरूच असताना काही वेळात त्याचा मृत्यू‎ झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सहा‎ जणांना अटक केली असल्याचे फ्रेजरपुराचे‎ ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी सांगितले.‎

शहरात ५४ तासात‎ खुनाच्या तीन घटना‎

फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मासोद‎ गावात सोमवारी सायंकाळी सात‎ वाजता चंद्रशेखर ऊर्फ बाबाराव‎ खंडारे (४५) यांचा खून झाला.‎ त्यानंतर बुधवारी सकाळी बडनेरा‎ हद्दीतील वडुरा जंगलात संजना‎ वानखडे या तरुणीचा तिच्या‎ प्रियकराने गळा चिरुन खून केला‎ आणि बुधवारी रात्रीच बारा ते‎ साडेबारा वाजेच्या सुमारास निखिल‎ तिरथकर याचा खून झाला. अवघ्या‎ ५४ तासाच्या कालावधीत शहरात‎ तीन खुनाच्या घटनांमुळे शहरात‎ खळबळ उडाली आहे.‎

बदल्याच्या भावनेतून खून‎

यश प्रकरणातील मुख्य मारेकरी‎ देवा जयस्वालच्या लहान‎ भावावर निखिल तिरथकरने सहा‎ महिन्यांपूर्वी प्राणघातक हल्ला‎ केला होता. त्याच हल्ल्याचा‎ वचपा काढण्यासाठी देवाने अन्य‎ पाच जणांच्या मदतीने निखीलचा‎ खुन केल्याचे समोर येत आहे.‎ -गोरखनाथ जाधव, ठाणेदार‎ फ्रेजरपुरा, अमरावती.‎