आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती:महिलेच्या कानशिलावर लावली बंदूक, दादा घरात आहेत म्हणताच चाेरटा भुर्र

परतवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर पोलिसांनी फिर्याद घेत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. - Divya Marathi
घटनेनंतर पोलिसांनी फिर्याद घेत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
  • अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील घटना

एक चोरटा चोरीच्या उद्देशाने एका बंगल्यात शिरला. महिलेच्या कानशिलाला त्याने बंदूकही लावली. त्यानंतर “राेकडा निकालो’ असे धमकावत त्याने महिलेकडे पैशाची मागणीही केली. मात्र, महिलेने समयसूचकता दाखवत दादा घरातच आहेत, असे सांगताच चोरटा आल्या पावली पुन्हा माघारी फिरला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील कापड व्यावसायिक अजय चंदनानी आणि प्रकाश चंदनानी यांच्या घरी शुक्रवारी घडली.

चोर बंगल्यात घुसला त्यावेळी अजय व प्रकाश हे लग्नाला गेले होते. घरी मंजू अजय चंदनानी, आरती प्रकाश चंदनानी व मुलगी गुंजन व अवंतिका होत्या. चोरट्याने बंगल्यात प्रवेश करताच आरती, गुंजन व अवंतिका यांनी स्वसंरक्षण करत एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. मात्र, किचनमध्ये असलेल्या मंजू यांना घरात आलेल्या सशस्त्र लुटारूबद्दल काहीही माहीत नव्हते. दरम्यान, त्याने स्वयंपाकघरात प्रवेश करत मंजू यांच्या कानशिलावर पिस्तूल ठेवत पैशांची मागणी केली. या वेळी समयसूचकता दाखवत मंजू यांनी न घाबरता त्याला माझ्याकडे पैसे नाहीत दादा वरच्या खोलीत आहेत, असे सांगितले. हे एेकताच चाेरट्याने मंजू यांना पुन्हा दारापर्यंत नेत पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून यात चोरटा दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...