आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:रस्त्यात अडवून बोलत मागे लागलेल्या‎ तरुणाला घेऊन तरुणी पोलिस ठाण्यात!‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ शहरातून चारचाकी घेऊन‎ अंजनगाव सुर्जीला एक तरुण‎ पोहोचला. यावेळी त्या तरुणाने‎ एका तरुणीला रस्त्यात थांबवून‎ तुझ्याशी बोलायचे आहे, असे‎ म्हणून तीचा पाठलाग सुरू केला.‎ त्यावेळी तरुणी म्हणाली चल‎ आपण पोलिस ठाण्यातच बोलू,‎ यावेळी तरुणीने थेट पोलिस ठाणे‎ गाठून हाेमगार्ड सैनिकांच्या‎ मदतीने त्याला पकडून‎ पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही‎ घटना अंजनगाव सुर्जी येथे ४ मे‎ रोजी दुपारी घडली.‎ तरुणीच्या तक्रारीवरून‎ पोलिसांनी आकाश नारायण‎ वानखडे (२८, रा. श्यामनगर,‎ अमरावती) याच्याविरुध्द‎ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.‎

नक्की प्रकरण काय?

तक्रारदार तरुणी ही अंजनगाव येथे‎ महाविद्यालयात आली होती.‎ गुरुवारी दुपारी ती‎ महाविद्यालयातून घरी पायी जात‎ होती. त्यावेळी तिच्या परिचित‎ असलेला अमरावतीचा आकाश‎ वानखडे हा एक कार घेऊन‎ तिच्याजवळ आला. थांब, मला‎ तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे‎ म्हणत त्याने तिला थांबण्याचा‎ प्रयत्न केला.

त्यावर तरुणीने,‎ आता आपण पोलिस ठाण्यातच‎ बोलू, असे म्हणून ती पायी चालत‎ राहिली. ती पुढील चौकात आली‎ असता तेथे तिला दोन होमगार्ड सैनिक‎ दिसले. आकाश वानखडे हा पाठलाग‎ करत असल्याचे तरुणीने दोन‎ सैनिकांना सांगितले. त्यावर ते दोन्ही‎ होमगार्ड आकाश वानखडेला त्यांच्या‎ दुचाकीवर बसवून पोलिस ठाण्यात‎ घेऊन गेले. ती तरुणीदेखील ठाण्यात‎ पोहोचली तिने आकाश वानखडे‎ विरुध्द तक्रार दिली.‎