आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रेकअप' हत्याकांड:अमरावतीत इंजिनीअरींगच्या तरुणीचा गळा चिरुन खून! तरुणही गंभीर जखमी बडनेरालगत जंगलात थरार

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या वडूरा जंगल परिसरात अभियांत्रीकीला शिकणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा अतिशय निर्दयीपणे गळा चिरुन खून झाला असून अभियांत्रीकीचाच तरुण त्याच ठिकाणी गंभीर अवस्थेत पडून होता. हा थरार बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. १०) सकाळी समोर आला. ‘ब्रेकअप’ नाट्यातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून सखोल तपास सुरू आहे.

संजना शरद वानखडे (१९, रा. परतवाडा) असे मृतक तरुणीचे तर सोहम गणेश ढाले (१९, रा. परतवाडा) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. हे दोघेही बडनेरा येथील न्यु राम मेघे इंजिनीअरींग कॉलेजच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहीती मिळताच पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, बडनेराचे प्रभारी ठाणेदार नितीन मगर, उपनिरीक्षक उमेश मारोडकर यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.

बुधवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान वडूरा जंगलात एक तरुणी व तरुण रक्तबंबाळ अवस्थेत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहचले असता तरुणीचा मृत्यू झाला होता तर तरुण जखमी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तरुणाला इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतक तरुणी व जखमी तरुण यांच्यात ब्रेकअपवरुन हे नाट्य घडल्याची प्राथमिक माहीती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संजना आणि सोहम हे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांची एकमेकांसोबत मैत्री होती मात्र तरुणीला त्याच्यासोबत मैत्री ठेवायची नव्हती, त्यामुळे तीने त्याला ब्रेकअपची मागणी केली होती. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान तरुणाच्या डाव्या हातावरसुध्दा कटरने वार केल्याप्रमाणे जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बॉक्स

तरुणीच्या गळ्यावर पाच वार, निर्दयीपणे चिरला गळा

तरुणीच्या गळ्यावर पाच वार असून ते वार कटरने केल्याप्रमाणे दिसत आहेत. दरम्यान तरुणीने मारेकऱ्याचा प्रतिकार केला असून त्यामध्ये तीच्या बोटांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अतिशय कृरपणे तरुणीचा खुन झाला आहे. तरुणीचे वडील निवृत्त पोलिस अंमलदार असून ते दोन महिन्यांपुर्वीच अमरावती ग्रामिण पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. अशी माहीती बडनेराा पोलिसांनी दिली आहे.