आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायतींनी वारंवार दिलेल्या नोटिशीकडे दुर्लक्ष करणे, गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना आता भोवणार आहे. त्यांच्या बांधकामांवर प्रशासनाचा गजराज चालणार आहे. १४ तालुक्यांतील ३ हजार ८६० बेकायदेशीर व विनापरवाना बांधकामे व किमान ७०२.०७ हेक्टरमधील अतिक्रमण आत निष्कासित करण्यात येणार आहे.
यामध्ये आजवर ४३० अतिक्रमणधारकांना नोटिस बजावण्यात आल्या असून, ही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. जिल्हाभरातील गायरान जमिनींना आता अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. ग्रामीण भागात कारवाईचा धाकच राहिला नसल्याने असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे सरकारचा उद्देशही साध्य होत नाही.
गायरान जमीन म्हणजे सरकार अधिग्रहित अशी जमीन, ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळवण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी कार्यालयांना देण्याकरिता राखीव ठेवल्या जात होत्या. जिच्यावरचा ताबा किंवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो. गायरान जमीन सरकारकडून भाडे तत्वावर मिळते. मात्र अलीकडे अशा जमिनींवर अतिक्रमण झाले आहेत.
नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू
राज्य शासनाने यासाठी कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे, त्यानुसार ही कारवाई होत आहे. ग्रामपंचायतींद्वारा सध्या या अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या येत आहेत.
-रणजित भोसले, उपजिल्हाधिकारी (महसूल)
अतिक्रमण होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष आहे. त्यावर विनापरवाना व बेकायदा बांधकामे या जमिनीवर होत असल्याने ही सर्व बांधकामे अतिक्रमित ठरली आहेत. १८ नोव्हेंबर १९९१ च्या शासनादेशानुसार, शासकीय पडीक व गायरान जमिनीचे अतिक्रमणापासून सरंक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीकडे सोपवलेली असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, या अतिक्रमित जमिनी व अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
न्यायालयीन निर्णयाचे अनुषंगाने गायरान क्षेत्रातील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुषंगाने ही कार्यवाही होत आहे, याकरिता जिल्हाभरात सर्वेक्षण करण्यात येऊन अतिक्रमण निश्चित करण्यात आले. त्यापैकी ४३० अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरूच असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील अशा ३ हजार ८६० जागांवर आता शासन गजराज फिरवणार आहे.
तालुकानिहाय अतिक्रमित क्षेत्र (हेक्टर)
जिल्हातील एकूण गायरान जमिनीचे क्षेत्र हे २०१०१.५७ हेक्टर इतके आहे. त्यापैकी अमरावती १०२.४२, भातकुली ६५.४२, नांदगांव खंडेश्वर ४५.६७, तिवसा २३.०६, धामणगाव ५.१७, चांदुर रेल्वे २९.०४, चांदूर बाजार ९०.७३, अचलपूर ७५.३८, दर्यापूर ६८.४६, अंजनगाव सुर्जी २६.२९, वरूड ४८.०१, मोर्शी ९४.८५, चिखलदरा २०.५८, धारणी ६.४५ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले आहे.
तालुकानिहाय अतिक्रमित क्षेत्र (हेक्टर)
जिल्हातील एकूण गायरान जमिनीचे क्षेत्र हे २०१०१.५७ हेक्टर इतके आहे. त्यापैकी अमरावती १०२.४२, भातकुली ६५.४२, नांदगांव खंडेश्वर ४५.६७, तिवसा २३.०६, धामणगाव ५.१७, चांदुर रेल्वे २९.०४, चांदूर बाजार ९०.७३, अचलपूर ७५.३८, दर्यापूर ६८.४६, अंजनगाव सुर्जी २६.२९, वरूड ४८.०१, मोर्शी ९४.८५, चिखलदरा २०.५८, धारणी ६.४५ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले आहे.
बेकायदा बांधकामांची तालुकानिहाय स्थिती
उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात ९११, भातकुली २७०, नांदगाव खंडेश्वर १११, तिवसा ६८, धामणगाव रेल्वे ७८, चांदूर रेल्वे ३९, वरुड २४९ व चांदूर बाजार ३९, अचलपूर ११७२, दर्यापूर ३३९, अंजनगाव सुर्जी ६२, मोर्शी १४०, चिखलदरा ६८, धारणी तालुक्यात गायरान जमिनीवरील ५४ बांधकामे बेकायदा आहेत, असे एकूण ३ हजार ८६९ विनापरवाना अतिक्रमण केले आहे. शासनाच्या कृती कार्यक्रमानुसार या अतिक्रमितांवर आता नोटीस बजावण्यात आल्या असल्याने या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.