आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धामणगाव रेल्वे:भुताटकीच्या नावावर संधीसाधू मांत्रिकाकडून शिवरा गावात भोळ्या फासेपारधींची दिशाभूल

धामणगाव रेल्वे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदगाव तालुक्यातील शिवरा गावात अंधश्रद्धेमुळे नागरिकांमध्ये दहशत

झाडफूक करण्याच्या नावावर महिलांना मांत्रिकाकडून मारहाणहीनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा या गावात होळीच्या िदवशी पारधी समाजातील लहानांपासून मोठ्यापर्यंत ३० ते ३५ लोक अचानक गोलगोल फिरायला लागले. या संधीचा फायदा घेत मांत्रिकाने या सर्वांना झपाटले असून, भुताटकी झाल्याचा बनाव करून भोळ्या फासे पारधींची फसवणूक करण्याचा प्रयत्न चालवला. या अंधश्रद्धेमुळे येथील ५०० गावकरी सध्या दहशतीत जगत आहेत. एवढेच नव्हे तर मांत्रिक झाडफूक करण्याच्या नावावर महिलांना मारहाणही करीत असल्याचा अमानुष प्रकारही येथे घडल्याचे उजेडात आले आहे. भोळ्या लोकांची फसवणूक केली जात असल्याचे कळल्यानंतर प्रश्नचिन्ह शाळेचे मतीन भोसले स्वत: शिवरा गावात पोहोचले. परंतु, त्यांनाही धक्काबुक्की करून तेथील बुवाने गावातून निघून जाण्यास बाध्य केले. त्यानंतर मतीन यांनी ‘अंनिस’ला येथील प्रकाराबाबत माहिती िदली.

त्यांनी नागरिकांना समुपदेशन करीत अंधश्रद्धेविषयी प्रबोधन केले. त्यानंतरही अशिक्षित पारधी समाजातील लोक मांत्रिकाचे ऐकून बाधा घालविण्यासाठी सावंगा विठोबा येथे गेले. याबाबत मतीन भोसले यांच्यासह अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच मंत्रिकांनी तेथून पळ काढला. फासे पारधी समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने मंत्रिकांचे म्हणणे ऐकून हे नागरिक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असल्याने अंधश्रद्धा पसरविणाऱ्या मांत्रिक विरुद्ध जादूटोणा कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत मतीन भोसले यांनी व्यक्त केले.

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यास मांत्रिक समर्थकांकडून धक्काबुक्की
झापाटले, भुताटकी झाली असा बनाव करून ३० ते ३५ जणांना मांत्रिकाने मारहाण केल्याचा प्रकार शिवरा गावात तीन दिवसांपासून सुरू असल्याचे कळल्यानंतर अंनिस अमरावतीचे सदस्य श्रीकृष्ण धोटे गावात पोहोचले. त्यांना धक्काबुक्की केली. याची माहिती पोलिस अधीक्षक हरि बालाजी एन. यांना दिल्यानंतर पोलिसांसह अंनिस कार्यकर्ते ज्यावेळी गावात पोहोचले त्यावेळी पांगापांग झाले.मांत्रिकाची दहशत व खोलवर मनात रूजलेली भिती, यामुळे गावकरी काहीही बोलण्यास तयार नव्हते.

डाॅ. हमीद दाभोळकर यांनाही कळविले : होळीच्या दिवसांपासून गावातील काही नागरिकांना भूतबाधा झाल्याचा जो बनाव सुरू आहे. त्याबाबत मी डाॅ.हमीद दाभोळकर यांना कळविले. त्यांनी याबाबत माहिती संपूर्ण ग्रुपमध्ये टाकली असल्याचेही मतीन भोसले यांनी सांगितले.

भोळ्या फासेपारधींची दिशाभूल करण्याचे काम
गावकऱ्यांना समजावण्यासाठी गेल्यानंतर मी तेथील काही व्हिडिओ काढले. त्यानंतर गावातील मांत्रिक माझ्या अंगावर धावून आले. तसाच प्रकार सावंगा विठोबा येथे आलेल्या नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी गेल्यानंतर घडला. भोळ्या फासे पारधी समाजाची मांत्रिकाकडून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. गावातील ५०० लोक सध्या दहशतीत आहेत. - मतीन भोसले, समाजसेवक

बातम्या आणखी आहेत...