आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अमरावतीत आयपीएलच्या मॅचवर सट्टा; दोन बुकींसह चौघे परतवाड्यातून ताब्यात

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तरुणाईला आयपीएल क्रिकेट सट्टयाचा नाद लागल्याची बाब आज, मंगळवारी पोलिसांनी उघड केली. पोलिसांच्या कारवाईदरम्यान आयपीएल सट्टा खेळणारे चौघे व दोन बुकी पकडले गेले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाईलसह 72 हजार 530 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सध्या इंडियन प्रिमीयर लिग क्रिकेटचे सामने सुरु आहेत. त्यामुळे या सामन्यांवर पैसे लावून सट्टा खेळणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सदर जुगार चालविणे हे बेकायदेशीर असताना शहरात तरुण मुले मोठया प्रमाणात सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी लगेच कारवाई सुरु केली.

काही इसम स्वत:च्या मोबाईलवर ऑनलाईन सट्टा खेळत होते. या दरम्यान पोलिसांनी आयुष संजय हरदे (19 हरदे नगर), निकुंज राजेश खंडेलवाल (22 चावलमंडी अचलपूर), लक्ष्मण प्रभाकर जिचकार (विदर्भ मिल जुनी चाळ), किशोर पांडुरंग फणसे (समर्थ कॉलनी देवमाळी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 68 हजार रुपये किंमतीचे 5 मोबाईल आणि 4 हजार 530 रुपये रोख असा 72 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हा सट्टा संकेत शरद शेळके (ब्राम्हणसभा कॉलनी) व राम प्रकाश शर्मा (कश्यप पेट्रोलपंप मागे) हे दोघेही भागीदारी पद्धतीने चालवत होते. या क्रिकेट बुकींच्या माध्यमातून एजेंटद्वारे तरुणांना ॲप डाऊनलोड करुन युजर नेम व पासवर्ड दिला जात होता, अशी पोलिसांची माहिती आहे.

आतापर्यंत शहरातील 30 ते 40 युवकांना यात सहभागी करुन घेण्यात आले. पोलिसांनी या दोन्ही इसमांचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतले. सदर आयपीएल सट्टा हा ॲपच्या माध्यमातून खेळला जात असून पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. सदर कारवाई ग्रामिण पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशीकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवगिरे, ठाणेदार संदीप चव्हाण, मनोज कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.