आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधामणगाव रेल्वे शहरातील एका ज्वेलरी दुकानात आलेल्या 3 महिलांनी चार दिवसांपूर्वी सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करुन एलसीबीच्या पथकाने तीन महिलांना तसेच त्यांचा कारचा चालक अशा चौघांना मंगळवारी (दि. 31) ताब्यात घेवून दत्तापूर पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले दागिने व चार लाख रुपयांची कार पोलिसांनी जप्त केली आहे.
शारदा महेश गोयल (52, वाडी, नागपूर), सीमा दिलीप साखरे (54, नागपूर), अनिता राजन मोरे (52, कौत्सल्यानगर, नागपूर) आणि कारचालक नितीन पांडूरंग मेश्राम (48, रा. कुकडे लेआऊट, नागपूर) या चौघांना अटक केली आहे. 27 जानेवारी 2023 रोजी धामणगाव रेल्वे शहरातील तिनखेडे ज्येलर्समध्ये या तिघी ग्राहक बनून आल्या होत्या. यावेळी या तीन महिला ज्या कारने आल्या होत्या, त्या कारचा चालक नितीत मेश्राम होता. या महिलांनी त्या ज्वेलर्समधून 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते.
दरम्यान पोलिसांनी आरोपींबाबत माहीती काढली असता त्या नागपूरातील असल्याची माहीती मिळाली होती. त्यामुळे एलसीबीचे पीएसआय मोहम्मद तस्लीम व पीएसआय मुलचंद भांबुरकर यांचे पथक नागपूरात गेले. त्यांनी कारचा शोध घेवून नितीन मेश्राम व या तीन्ही महिलांना गाठले.
यावेळी त्यांनी पोलिसांनी सांगितले कि, हातचलाखीने सोन्याचा दागिना चोरला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना तसेच चांदीचे काही दागिने व कार असा एकूण 4 लाख 88 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
या तिन्ही महिलांना एलसीबीने ताब्यात घेवून नागपूरातून आणले व दत्तापूर पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. दत्तापूर पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे. ही कारवाई एलसीबीचे पीआय तपन कोल्हे, पीएसआय मोहम्मद तस्लीम, पीएसआय मुलचंद भांबुरकर, पुरूषोत्तम यादव, उमेश वाकपांझर, मंगेश लकडे, सचिन मसांगे, ऋषाली वाळसे, संदीप नेहारे व सायबर पोलिसांनी केली आहे.
बॉक्स
नागपूर, भंडारा जिल्ह्यातही केले गुन्हे
या 3 महिलांविरुध्द नागपूर जिल्ह्यातील जलालखेड, खापा, बेलतरोडीसह भंडारा जिल्ह्यातील वैजापूर पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याबाबत नोंद आहे. त्यांनी अमरावतीमध्ये या गुन्ह्याव्यतिरीक्त अूजन काही गुन्हे केले आहेत का, याबाबत ग्रामिण पोलिस तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.