आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदायीनी शकुंतला रेल्वेचा 110 वा वाढदिवस:सत्याग्रहींनी केक कापून केला साजरा, ब्रिटीश काळात झाली होती मार्गाची पायाभरणी

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

1909 साली ब्रिटिश इंजिनियर मिस्टर एडवर्ड यांच्याद्वारे सर्व्हे करून अभियंता थोरपे यांच्या मार्गदर्शनात शकुंतला रेल्वे मार्गाची पायाभरणी झाली होती. अवघ्या चार वर्षात रेल्वे स्टेशन, पूल, पटरी, विहिरी, झाडे लावून 1913 साली शकुंतला रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे मालगाडी धावली होती. 1 जानेवारी 1914 रोजी पहिली प्रवासी गाडी धावली. हे औचित्य साधून दर्यापूरातील बनोसा रेल्वे स्थानकासमोर, रेल्वे स्थानकांची स्वच्छता करून, शकुंतला रेल्वेचा केक कापून 110 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

शकुतला रेल्वे बचाव सत्याग्रही विजय व्हिल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले होते. ‘शंकुतला गाडी सुरू झालीच पाहीजे’, ‘शंकुतला गाडी है गरीबो और व्यापारीओ की नाडी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

संविधानिक प्रश्न निर्माण

या प्रसंगी शकुंतला रेल्वे आहे त्या स्थितीत सुरू करा, असा सर्व सत्याग्रहीनी निर्धार व्यक्त केला. दर्यापूर येथील कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांच्याप्रती मालिनी पाटील यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या वेळी मनोज रेखे, नम्रता शहा, संगीता पुंडे, संघमित्रा खंडारे यांनी शकुंतला रेल्वे गोरगरीब, दिनदुबळ्या आदिवासी, कष्टकरी, शेतकऱ्यांची जीवनदायीनी आहे हे प्रभावीपणे विशद केले. दरम्यान सत्याग्रही विजय विल्हेकर यांनी शकुंतला रेल्वेच्या मालकी संदर्भात संविधानिक अनेक प्रश्न निर्माण केले.

न्यायालयात जाण्याचेही मत

एखादे मूलभूत दळणवळणाचे साधन, नागरिकांच्या अनुमतीशिवाय रेल्वे विभागाला बंद करता येते का, असा शकुंतला रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत अधिकाराचा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात उच्च न्यायालयात जाण्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

रेल्वेच्या वाढदिवसाचा समारोप

या प्रसंगी दीपक शर्मा, गजानन देवतळे, सुनीता मंडवे, रामदास चव्हाण, गजानन देवके, जनार्दन गावंडे, शेखर पाटील रेखे, सुनील साबळे, दिनेश मोहता, गोपाल तराळ, माधव देशमुख, श्याम कावडकर, प्रदीप पंपालिया, विजय कावरे, संतोष गायकी, दीपक नेतकर, मनोज तायडे, पंकज कदम, अनिल काळे, विश्वास काळे आदी सत्याग्रहींनी सहभाग घेतला. शेवटी डॉ. विठ्ठल वाघ रचित शकुंतला भजनानी या शकुंतला रेल्वेच्या वाढदिवसाचा समारोप करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...