आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा कपाशी, तूर, सोयाबीनला सध्याही हमीभावापेक्षा जास्त भाव असल्याने या पिकांची काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मूग व उडदाचे पीक दरवर्षीच पावसाअभावी बाधित होत आहे. या वर्षीदेखील ‘एल निनो’च्या प्रभावाने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज काही हवामान विषयक संस्थांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अमरावती महिनाभरावर आलेल्या खरीप हंगामासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. यामध्ये प्रस्तावित क्षेत्र व त्यासाठी लागणारी रासायनिक खते, बियाण्यांसाठी नियोजन सुरू आहे. यंदाच्या खरिपासाठी ६.८१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे व या अनुषंगाने विभागीय कृषी विभागाने आढावा घेतला.जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र आहे.
तालुकानिहाय पथके
कृषी विभागाद्वारे बियाणे, खतांचा काळाबाजार होऊ नये, बियाण्यांची टंचाई भासू नये तसेच नियमबाह्य व बनावट बियाणे विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तर एक व तालुक्याचे १४ अशी १५ पथके तयार करणार आहेत. या पथकांचा या प्रकारांवर वॉच राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाद्वारे २ लाख ९७ हजार ८०५ मे. टन रासायनिक खतांची मागणी नोंदवली.
कृषी विभाग लागले कामाला
१.२२ लाख क्विंटल बियाण्यांची गरज यंदाच्या खरीप हंगामासाठी १, लाख २१ हजार ५२९ क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये ६४,१३१ क्विंटल सार्वजनिक व ५७,३१८ क्विंटल खासगीरीत्या उपलब्ध होणार आहेत. याशिवाय ६१,५०९ क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहेत. यंदा सर्वाधिक १,०५,२५० क्विंटल सोयाबीन बियाणे लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने कृषी विभाग कामाला लागला आहे.
पीकनिहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)
सोयाबीन ५५,००० सं. कापूस २,६०,००० तूर १,१३, ००० मूग ७,८०० उडीद १,९० ज्वारी १२००० धान ७.९०० ६.८१ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.