आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 लाखांचा मुद्देमाल जप्त:एटीएम फोडण्यासह घरफोडी करणारा अट्टल चोरटा 'एलसीबी'च्या जाळ्यात; 13 गुन्ह्यांची दिली कबुली

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुरुड येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांची घरे फोडून लाखोंच्या ऐवजावर हात साफ करणाऱ्या अट्टल घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि.1) अटक केली. या चोरड्याने वरूड, बेनोडा, मोर्शी, शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 13 गुन्ह्यांची कबुली दिली. शिवाय, वर्धा व नागपूर जिल्ह्यात घरफोडी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चरणसिंग गब्बूसिंग भादा (32, रा. पांढुर्णा, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव आहे. ग्रामीण भागातील वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. अशात घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये चरणसिंग भादा याचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चरणसिंग भादा याला पांढुर्णा येथून अटक केली.

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वरूड, बेनोडा, मोर्शी व शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 13 घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्याने वर्धा, नागपूर जिल्ह्यातही घर व दुकाने फोडल्याचे पोलिसांना सांगितले. वरूड येथील एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार त्याच्याकडून 58.630 ग्रॅम सोने व चोरीच्या पैशातून खरेदी केलेली कार असा 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नितीन चुलपार, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष मुंदाने, बळवंत दाभने, रवींद्र बावने, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, सागर धापड, रितेश वानखडे, शिवा शिरसाठ, सरिता चौधरी आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...