आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या टिळक भवन, दादर येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाली. अमरावती लोकसभेची जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून ती मूळ काँग्रेस पक्षाची आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे स्थानिक स्तरावरील उमेदवार नाही. त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागतो. निवडणूक आल्यावर उमेदवार स्वताच निर्यात होतो काँग्रेस पक्षाकडे स्थानिक स्तरावर सक्षम व प्रबळ उमेदवार आहेत. त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी अशी आग्रही मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केली.
मागील २५ वर्षांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे पंजा चिन्हच नसल्याने यांचा परिणाम विधानसभेत झालेला आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा छत्रपती शिवाजी महाराज, मौलाना अब्दुल कलाम आझाद व राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची असून या विचाराचा उमेदवार पक्षाने दिल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघात सामाजिक न्यायाचा संदेश जाईल.
असे वस्तुस्थिती दर्शक प्रभावी मुद्दे बोरकर यांनी बैठकीत मांडून सर्व ज्येष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ.नितिन राऊत, माजी मंत्री अॅड, यशोमती ठाकूर, चंद्रकांत हंडोंरे, नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अॅड.दिलीप एडतकर, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मागणी करताना सरचिटणीस किशोर बोरकर.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.