आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:अमरावतीने ऑक्सिजन मॅन गमावला; पहाटे पाच वाजेच्या सुमारास हृदयविकाराने निधन

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीचे ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे तरुण उद्योजक हिमांशू अजीतभाई वेद (वय ४२) यांचे मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. येथील मांगिलाल प्लॉट स्थित (आयएमए हॉलच्या मागे, कॅम्प रोड) निवासस्थानाहून सायंकाळी हिंदू स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी कुंजनबेन, मुलगी राधा, सुपुत्र ध्रुव आणि अर्जुन, बहिण चेतना बेन हिरामणी शर्मा आणि सपनाबेन संदीपभाई मेहता व बराच मोठा आप्त परिवार आहे. गुजराती समाजातील प्रतिष्ठित नागरिक, वैष्णव पंथाचे अनुयायी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच जे.एच. गोकुलदास आणि श्री वल्लभ गॅसचे संचालक व मधुरम प्री-प्रायमरी कॉन्व्हेंटचे संचालक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर ते कार्यरत होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य, हरिना नेत्रदान समितीचे माजी कोषाध्यक्ष होते.

यासाठी राहतील कायम स्मरणात संकटसमयी ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून वीस-वीस तास काम करणारे, स्वतःच्या कारखान्यात दुसरा ऑक्सिजन प्लांट उभा करून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती करत हजारो कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवणारे, युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती करणारे म्हणून ते ओळखले जात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील कोरोनाग्रस्त नागरिकांच्या कुटुंबीयांना स्वत:च्या कारखान्यातून विनाशुल्क ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला होता. या सेवा कार्यामुळे त्यांनी अनेकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. या कार्यासाठी त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्कारही देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...