आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना फोन करून 'कुक' ने केली आत्महत्या:अमरावतीतील घटना, मनपा रुग्णालयाच्या आवारातच घेतला गळफास

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चपराशीपुरा भागातून मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास टोल फ्री क्रमांक -112 वर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने पोलिसांना आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच मोबाईल क्रमांकावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन करणारा व्यक्ती काही दिसलाच नाही. दरम्यान, मंगळवारी (दि. २०) सकाळी आठ वाजताच्या सुमारास चपराशीपुरा भागातील मनपा रुग्णालयाच्या आवारात एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

वॉटर पार्कमध्ये होता स्वयंपाकी

रामेश्वर मारोतराव सोनोने (42, रा. खंडाळा ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृतकाचे नाव आहे. रामेश्वर सोनोने हे चांदूर रेल्वे मार्गावरील एका वॉटर पार्कमध्ये 'कुक' म्हणून काम करत होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास डायल ११२ वर पोलिसांना फोन करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

रिटर्न कॉल केला, तो म्हणाला मला शोधा

रात्री उशीरा फोन आल्यानंतर पोलिसांनी संबधित मोबाईल क्रमांकावर पुन्हा कॉल करुन कोण व कुठून बोलत आहे. हे विचारले तसेच आत्महत्या करु नका, आम्ही पोहचत आहोत, असे सांगून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनोने यांनी पोलिसांना ते कुठे आहे, याबाबत माहीती न देताच तुम्ही पोलिस आहे, माझा शोध घ्या, असे म्हणून मोबाईल कट केला. त्यानंतर सोनोने यांनी मोबाईल ‘स्विच ऑफ’ केला.

मोबाईलवरून मृतकाची ओळख पटली

त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास फिरोज नामक व्यक्तीने फ्रेजरपुरा पोलिसांना माहीती दिली कि, चपराशीपुरा भागातील मनपा रुग्णालयाच्या परिसरात एका व्यक्तीने गळफास घेतला आहे. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.

फोन क्रमांकावरून ओळख पटली

याचवेळी मृतकाजवळ असलेल्या मृतकाजवळ असलेला मोबाईल सुरू केला असता त्यावर ज्यावरून पोलिसांना कॉल आला होता. तो हाच नंबर असल्याचे स्पष्ट झाले. रामेश्वर सोनोने यांच्या पत्नीचा हा नंबर असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून त्यांची ओळख पटली, असे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली, याबाबत पोलिस माहीती घेत आहेत. तुर्तास पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...