आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाने जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ गतवर्षी २२ एप्रिल रोजी बरखास्त करून सहाय्यक निबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. दरम्यान आता पुन्हा बाजार समितीला निवडणुकीचे वेध लागले असून लवकरच तिचा बिगूल वाजणार आहे. बाजार समितीची सुधारित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून दावे व हरकतीनंतर 20 मार्च रोजी अंतिम सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक तथा बाजार समिती प्रशासक राजेश यादव यांनी दिली.
न्यायालयाने 30 एप्रिलच्या आत निवडणूका घेण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. त्यानुसार अंतिम मतदार यादीच्या कार्यक्रमानंतर लगेच एप्रिल महिन्यात या निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेल्या बाजार समिती निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा मतदार यादी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असलेल्या सुधारित यादीत नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या 25 ग्रामपंचायत तसेच सोसायटीच्या सदस्यांना स्थान मिळाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मतदार संघ व सोसायटी मतदार संघाच्या मतदार संख्येत वाढ झाली आहे.
बाजार समिती निवडणूक अनुषंगाने जाहीर सुधारीत प्रारुप मतदार यादीवर 8 ते 17 मार्च दरम्यान हरकती तसेच हरकतीवर सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान सद्यस्थितीत शिंगणापूर, लासूर व पिंपळखुटा या 3 सोसायटींची निवडणूक प्रक्रीया सुरू त्यांच्या नवनियुक्त सदस्यांचा समावेशाचा घोळ कायम असणार आहे. मात्र 30 एप्रिल पुर्वी निवडणूका घेण्याचे निर्देश असल्याने अंतिम मतदार यादीच्या कार्यक्रमानंतर लगेच बाजार समितीमध्ये निवडणुकींचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील दिग्गजांसोबतच शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे.
मतदारसंघ
यांनी गाजवली कारकीर्द
संचालकाची निवडणूक झाल्यानंतर त्यातून बहुमताच्या आधारे सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येते. येथील समितीवर आजवर बाळासाहेब देशमुख, बापुसाहेब कोरपे, कुलदीप पाटील गावंडे, मदन पाटील बायस्कार, अरुण पाटील गावंडे, बाळासाहेब वानखडे, बाबाराव पाटील बरवट आदी सहकार धुरीणांनी सभापती म्हणून कारकीर्द गाजविली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.