आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा सभापती मिळणार:12 बाजार समित्यांमध्ये 17 ते 22 मेदरम्यान‎ सभापती, उपसभापती पदांकरिता निवड प्रक्रिया‎

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांमध्ये‎ संचालक पदांकरिता नुकत्यांच‎ निवडणुका पार पडल्या असून, त्याचा‎ निकाल देखील लगेच घोषित करण्यात‎ आला आहे. त्यामुळे सभापती व‎ उपसभापती पदाच्या निवडणुकीची‎ प्रतिक्षा सहकार नेत्यांना लागली असता‎ १२ बाजार समित्यांमध्ये निवडणुक‎ कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.‎

१७ ते २२ मे दरम्यान बाजार समित्यांमध्ये‎ दोन्ही पदाकरीता निवडणुक होणार‎ असून अमरावती बाजार समितीला १९ मे‎ रोजी नवीन सभापती मिळणार आहे.‎ त्यामुळे कुणाच्या गळ्यात सभापतींची‎ माळ पडते याकडे आता सर्वांचे लक्ष‎ लागले आहे.‎

पदनिवडीकडे सर्वांचे लक्ष

जिल्ह्यात अमरावतीसह अंजनगाव‎ सुर्जी, दर्यापुर, चांदूरबाजार, धारणी,‎ मोर्शी, वरूड, नांदगाव खंडेश्वर,‎ तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या‎ १२ बाजार समित्यांमध्ये २८ ते ३०‎ एप्रिलदरम्यान मतदान व मतमोजणी पार‎ पडली. त्यामुळे आता सभापती आणि‎ उपसभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचे‎ लक्ष लागले होते. याचीही प्रतीक्षा आता‎ संपली आहे. उपनिबंधक कार्यालयाने या‎ पदांसाठी अधिसूचना जाहीर करताच १२‎ ही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी‎ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.‎

बिनविरोध निवडणूकीची शक्यता

अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर‎ बाजार समितीमध्ये एकाच १७ मे रोजी‎ निवडणूक होणार आहे. एका दिवशी‎ दोन किंवा चार बाजार समित्यांमध्ये‎ सभापती, उपसभापती पदांसाठी‎ निवडणूक होऊ घातली आहे. २२ मे‎ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.‎ जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये‎ एका पॅनलला स्पष्ट बहुमत असल्याने‎ तेथील निवडणुक बिनविरोध होण्याची‎ शक्यता आहे.

परंतु जेथे बहुमत नाही‎ तेथे मात्र, निवडणूक होणार आहे.‎ ‎सोमवारी उपनिबंधक कार्यालयातून‎ सभापती तसेच उपसभापती‎ निवडणुकीबाबतची अधिसूचना जारी‎ होताच हा निवडणूक कार्यक्रम घोषित‎ करण्यात आला आहे.‎