आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:खासदार नवनीत कौर राणा यांच्या पाठोपाठ पती आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणा कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

खासदार नवनीत कौर राणा यांच्यापाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच राणा कुटुंबातील बारा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये राणा दाम्पत्याच्या दोन लहान मुलांसह रवी राणा यांच्या आई-वडिलांचा समावेश आहे. राणा कुटुंबावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवनीत राणा यांनी फेसबुकवरुन कोरोना झाल्याची पुष्टी केली. त्यांनी लिहिले की, 'माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते. मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. असे त्या म्हणाल्या आहेत.

नवीन राणा यांनी त्यांच्या संपर्कातील लोकांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिले की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा ,शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे.'

बातम्या आणखी आहेत...