आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणांना दिलासा:खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणांना दिलासा, सुप्रीम कोर्टाने निर्णयाला दिली स्थगिती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांकडून करण्यात आला होता.

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केले होते. यानंतर आता सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जात प्रमाणपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थिगिती दिली आहे. हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाकडून स्थिगिती दिली असल्याने नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांकडून करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिव्ह्यू याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे. दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी नवनीत राणा यांनी आपल्या याचिकेमध्ये केली होती.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यासोबतच सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...