आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावतीकरांचा सन्मान:अमृत गटात अमरावती महापालिकेने पटकावला वसुंधरा पुरस्कार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या 2020-21 मध्ये झालेल्या माझी वसुंधरा 2.0 स्पर्धेत अमरावती महानगर पालिकेने अमृत गटात विभाग स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत रविवार 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला.

हा पुरस्कार महानगर पालिकेच्या वतीने प्रशासक डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्विकारला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे उपस्थित होते.

वातावरणीन बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाद्वारे उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 2.0 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...