आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमधील धक्कादायक घटना:चाकूचे 43 वार करुन युवकाचा खून, पोटावर केला खड्डा; मृतदेह जाळण्याचाही केला प्रयत्न

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या जंगलामध्ये घटनास्थळी झालेली गर्दी, पोहाेचलेले पोलिस पथक. - Divya Marathi
अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या जंगलामध्ये घटनास्थळी झालेली गर्दी, पोहाेचलेले पोलिस पथक.
  • जुन्या वादातून मित्रांनीच ‘गेम’ केल्याचा संशय; खूनप्रकरणाने हादरले शहर
  • अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या जंगलामध्ये आढळला मृतदेह

शहरातील बेलपूरा परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवकाचा चाकूच्या वारांनी अक्षरश: चाळणी केलेला मृतदेह अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या जंगलात रविवारी ३० मे राेजी आढळला आहे. मारेकऱ्यांनी या युवकावर एक, दोन नव्हे तर चाकूचे तब्बल ४३ ते ४५ गंभीर घाव केले आहे. इतकेच नाही तर त्याच्या पोटावर ६ इंच रुंद आणि सुमारे ४ इंच खोल इतकी भयानक जखम करुन आतडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावरच मारेकऱी थांबले नाही तर मृतदेह पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. निर्दयतेचा कळस गाठणाऱ्या या खूनप्रकरणाने अख्खे शहर हादरले आहे. या प्रकरणात बडनेरा पोलिस मोरकऱ्यांचा शोध घेत आहेत.

रोहन ऊर्फ बच्चू किसनराव वानखडे (२२, रा. बेलपूरा, अमरावती.) असे मृतक युवकाचे नाव आहे. रोहन वानखडे हा कॅटरींगचे काम करत होता. शनिवारी २९ मे राेजी सांयकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रोहनला त्याच्या दोन मित्रांनी घरी जावून सोबत घेतले. त्यानंतर हे तिघेही सोबत निघून गेले. मात्र उशिरा रात्रीपर्यंत रोहन घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटूंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली मात्र तो सापडला नव्हता. दरम्यान रोहनच्या आईने रात्री बारा वाजताच्या सुमारास राजापेठ पोलिस ठाणे गाठून मुलगा घरी न आल्याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे राजापेठ पोलिसांनीही त्याचा शोध घेतला होता. रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगत वनविभागाच्या राखीव जंगलात उर्वरित. पान ३

काही महिन्यांपूर्वी बच्चूचा त्यांच्यासोबत झाला होता वाद
रोहीत ऊर्फ बच्चू वानखडे त्याच्या दोन मित्रांसह घरुन गेला होता. त्यानंतर त्यांच्यासमवेतच तो उशिरा रात्री पर्यंत बसला व त्यांनी जेवण केले. त्यानंतरच त्याच दोघांनी बच्चू चा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा त्यांच्याशी वाद झाला होता. वाद कशासाठी होता, ते समोर आले नाही. पोलिस या दोन्ही मित्रांचा शोध घेत आहेत. मात्र रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत मोरकरी मिळाले नव्हते. बच्चू वानखडेवर यापूर्वी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती.

मृतकाच्या पोटावर अक्षरश: चाकूने कोरुन केला खड्डा
मारेकऱ्यांनी बच्चूला इतक्या क्रुरतेने मारले कि, शरीराचा असा एकही अवयव नसेल कि, ज्या ठिकाणी चाकूचा घाव नाही. पोटात तर अक्षरश: चाकू मारुन, मारुन ६ बाय ४ इंचाचा भला मोठा खड्डाच तयार केला. त्यामधून आतडेसुद्धा बाहेर आले असतील मात्र जाळल्यामुळे ते दिसत नाही. तसेच छाती, पाठ व शरीराच्या प्रत्येक भागावर वार दिसत होता. चेहऱ्यावरच तब्बल सात मोठे वार आहेत. हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या संपूर्ण शरीराची चाळणी झाल्याचे दिसत होते.

मोरकऱ्यांच्या शोधात पाेलिस पथक रवाना
बच्चू वानखडे हा शनिवारी सायंकाळी त्याच्या दोन मित्रांसोबत घरुन गेला होता. रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला. त्या दोघांसोबत त्याचा जुना वाद असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्या दोघांनीच त्याचा खून केला, असा संशय असल्याने त्यांना पकडण्यासाठी आम्ही पथक रवाना केले आहेत. शशिकांत सातव,पोलिस उपायुक्त.

बातम्या आणखी आहेत...