आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या पोटात चाकू मारला, मात्र पाते पोटात अडकले:शस्त्रक्रिया करून काढले चाकूचे पाते; अमरावतीतील घटना

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन तरुणांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या पोटात चाकू मारला. मात्र चाकू पोटातून बाहेर काढताना पाते पोटात अडकले आणि मुठ बाहेर आली. अखेर त्या 30 वर्षीय युवकाला चाकूच्या पात्यासह तत्काळ इर्विनमध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी पोटात फसलेले चाकूचे पाते बाहेर काढले. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शहरातील आझादनगर भागात सोमवारी (दि. 29) घडली आहे.

सै. ईरशाद सै. कदिर (30, आझादनगर) असे जखमी तरुणाचे नाव असून नितेश रमेश अडोकार (24, रा. झाडपीपूरा, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. सोमवारी या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे कारण मात्र सोमवारी सांयकाळपर्यंत समोर आले नव्हते. वाद झाला त्यावेळी नितेशने धारदार चाकू सै. ईरशादच्या पोटात खुपसला. यावेळी चाकू बाहेर काढताना मुठ नितेशच्या हातात आली मात्र चाकूचे सुमारे साडेतीन इंच लांबीचे पाते पोटाच्या आतमध्ये जावून अडकले. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत इर्विनमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून पाते बाहेर काढले. तसेच पुढील उपचारासाठी सै. ईरशादला नागपूरला रवाना केले असल्याची माहीती गाडगेनगर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नितेश अडोकारविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळताच घटनास्थळ कोणत्या ठाण्याच्या हद्दीत आहे हे स्पष्ट नव्हते, त्यामुळे नागपूरी गेटचे पीआय विवेक राऊत व गाडगेनगरचे अधिकारी आपआपल्या पथकासह इर्विनमध्ये दाखल झाले होते. तसेच एसीपी पुनम पाटीलसुध्दा इर्विनला आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...