आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:क्वारंटाइन असलेल्या कुटुंबाच्या घरामध्ये शिरला चोर; तासाभरानंतर आला बाहेर... पोलिसांना म्हणाला, हात लावू नका, मी कोरोनाबाधित

अमरावती10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमरावतीत शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचला लाखोंचा ऐवज, नागपुरात दूध चोरांना शोधताना पोलिसांची दमछाक

घरात कोणीही नाही. याच संधीचा फायदा घेऊन सुंदरलाल चौक परिसरातील चोरटा रविवारी मध्यरात्री एका घरात घुसला. मात्र, शेजाऱ्यांना शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर सुमारे तासाभराने चोरटा बाहेर आला. ताे पोलिसांपासून लांब उभा राहिला आणि म्हणाला... साहेब, मला हात लावू नका, मी कोरोनाबाधित आहे. मात्र, पोलिसांना बनवेगिरी लक्षात आल्याने त्याला अटक केली. सूरज नरेंद्र दर्शनाल (३०, रा. सुंदरलाल चौक) असे चोरट्याचे नाव आहे. बिच्छुटेकडी भागातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कुटुंबांतील सर्व संस्थात्मक विलीनीकरणात आहेत. 

मध्यरात्री एक वाजता कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने लाइटही लावले. शेजाऱ्यांना संशय येताच त्यांनी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्लॅबवर जाऊन घरात पाहिले असता चोरटा स्वयंपाक खोलीत लपल्याचे दिसले. तासाभरानंतर तो घराबाहेर आला. पोलिस त्याच्या जवळ जात असतानाच त्याने सांगितले की, मला हात लावू नका, मला कोरोना झाला आहे. त्यामुळे काही क्षण पोलिसही थांबले. मात्र, चोरटा बनवाबनवी करत असल्याचे लक्षात येताच त्याला ताब्यात घेतले. चोरट्याने दोन कपाटे फोडून साहित्य अस्ताव्यस्त केले होते. आणखी दोन कपाटे फोडली नव्हती. त्याच कपाटात सोने आणि सुमारे २ लाखांची रोकड असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हजारो रुपयांची रोकड सोडून ३ तरुणांनी केली १० लिटर दुधाची लूट!

नागपूर शहरात तीन तरुणांनी नकली बंदुकीचा धाक दाखवून चक्क १० लिटर दुधाची लूट केली. आश्चर्य म्हणजे दुधाच्या या स्टॉलवर हजारोंची रोकड असताना फक्त दूध लुटून नेले. पोलिसांनी शेकडो वाहनचालकांचा तपास करत त्यांना शोधले. नागपूरच्या वंजारी भागात शासकीय दूध योजनेच्या स्टॉलवर रामकृष्ण शेळके हे ११ जूनच्या पहाटे ४ वाजता त्यांच्या नेहमीप्रमाणे दुधाच्या गाडीतून कॅरेट खाली उतरवताना ८३४० या क्रमांकाच्या दुचाकीवर तीन तरुण तिथे आले. आपसात “निकाल रे अपनी बंदूक, अभी एक का गेम बजाए है. इसका भी गेम बजाते है’ असे संभाषण सुरू केले. तेवढ्यात एकाने खिशातून बंदूक काढण्याचा बनाव करत रामकृष्ण यांच्याकडे धाव घेतली. बंदूक पाहताच वृध्द घाबरल्याचे पाहून तिघांनी दुधाच्या स्टॉल वरून १० लिटर दूध उचलून नेले.

भूक लागली म्हणून..

३ दिवस शोध घेतल्यानंतर पोलिस अभिजित ढोके, गौरव पांडे आणि कुशल सरणकर यांच्यापर्यंत पोहोचले. ते म्हणाले, पहाटे झोप उघडल्यावर जोरात भूक लागली होती. एवढ्या सकाळी घरचे नाश्ता वगैरे बनवून देणार नव्हते. तसेच एवढ्या पहाटे दुधाचे स्टॉल वगळून दुसरे काहीच उघडे नसल्यामुळे आम्ही दूधच लुटून नेले.

बातम्या आणखी आहेत...