आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती शहरातील नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महापालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार त्यांनी आगामी ३१ मार्चपर्यंत थकीत मालमत्ताकर भरल्यास त्यांना २५ टक्के सुट दिली जाणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ही घोषणा केली असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेतर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे झोन स्तरावर विशेष वसुली अभियान राबविणे ही होय. यामुळे नागरिकांना ते रहात असलेल्या ठिकाणाहून अगदी जवळ मालमत्ता कर भरणे शक्य झाले आहे. दरम्यान या उपक्रमाला मालमत्तांधारकांकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याने मार्चअखेरपर्यंत निर्धारित लक्ष्य पुर्ण करण्यात येईल असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नसेल त्यांनी त्वरीत मालमत्ताकर भरुन महानगरपालिकेला सहकार्य करावे. जे मालमत्ता धारक मालमत्ता कर भरणार नाही त्यांची मालमत्ता जप्त करण्यासंदर्भातील कार्यवाही होणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या www.amravaticorporation.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकींग / एनईएफटी / आरटीजीएस याव्दारेही कराचा भरणा नागरिकांना करता येईल.
सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सोय
अधिक माहिती देताना मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३१ मार्च, २०२३ पर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक ७५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना दंडात्मक रक्कमेवर २५ टक्के सूट मिळणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या निर्देशानुसार सुटीच्या दिवशीदेखील (शनिवार व रविवार) देखील मालमत्ता कर शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.