आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक शेतकऱ्यांचा हरभरा नाफेडमार्फत खरेदी करण्यात आला खरा. पण त्या व्यवहाराचे पैसे अद्याप संबंधितांना मिळाले नाही. त्यामुळे शासन किती वेळा आणि कशाप्रकारे आम्हाला नाडवणार, असा प्रश्न हरभरा विक्रेत्यांनी केला आहे.
नाफेडला हरभरा विकण्यासाठी येथील ४ हजार २४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीपश्चात १४ मार्चपासून प्रत्यक्ष खरेदी-विक्री सुरु करण्यात आली. दरम्यान आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांचे १० हजार ५०० क्विंटल हरभरा पीक खरेदी करण्यात आले. विकलेल्या मालाची किंमत ५ कोटी ६३ लाख १६ हजार २६० रुपये होते. मात्र अद्यापही ही रक्कम संंबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही. संबंधित शेतकऱ्यांतर्फे वरचेवर खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र पेमेंट अद्याप वरुनच यायचे आहे, याशिवाय दुसऱ्या शब्दात उत्तर दिले जात नाही.
पैसा नाही… सूचत नाही
मेहनतीने पीक कमावले. वेळेवर सोंगणी केली. बाजारात भाव नाही म्हणून त्या पिकाची जपणूकही केली. वारंवार मागणी केल्यानंतर सरकारने कधीकाळी हरभरा खरेदी केंद्र सुरु केले. त्यामुळे पहिली पसंती म्हणून नाफेडला हरभरा विकला. परंतु अद्याप मोबदला मिळाला नाही. हातात पैसा नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी अडकल्या आहेत. - एक त्रस्त शेतकरी, चांदूर रेल्वे.
पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात
नाफेडला हरभरा विकल्यानंतर त्या मालाची रक्कम लवकरच प्राप्त होते. ज्या ५०० शेतकऱ्यांनी त्यांचा हरभरा नाफेडला विकला, त्यांचेही पैसे प्राप्त झाले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायचे आहे. मात्र लवकरच ते केले जातील.
सुरेश चाकूरकर, सचिव,
खरेदी विक्री संघ चांदुर रेल्वे.
—---------------------------
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.