आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापानवेली बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित 'राज्यस्तरीय बारी समाज उपवर युवक-युवती परिचय मेळावा' येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला मध्य प्रदेशसह राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान "पानवेली- 2022-23" या रंगीत स्मरणिकेचे विमोचनही करण्यात आले.
मेळाव्यामध्ये नोंदणी झालेल्या 850 उपवर युवक-युवतींची छायाचित्रांसह एकत्रित माहिती असलेली 'पानवेली- 2022-23' या रंगीत स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नोंदणी झालेले व वेळेवर उपस्थित असलेल्या सर्व उपवर युवक-युवती आपला परिचय मेळाव्यामध्ये दिला.
बारी समाज बांधवांचे आकर्षण असलेल्या या उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याकरिता 900 हून अधिक उपवर युवक-युवतींची नोंदणी झाली. या मेळाव्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून व मध्यप्रदेशातून 5 हजारावर समाजबांधव उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जि. प. शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक निळकंठ यावले होते. तर उद्घाटन शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत निमकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर समाजबांधव राजकुमार वसुले, गजानन दातीर, सुधीर बदूकले, किशोर याउल, सतीश दातीर, प्रमोद कुकडे, विनोद हेंड, सुरेश घायर, नरेंद्र बेहरे, दिनेश हेंड, श्रीकांत खाजोने, ज्ञानेश्वर धर्मे, संजय सुने, डॉ. निलेश इंगोले, विकास रेखाते, जयेश दाभाडे, शीतल दुधे, सुधा दारोकर, श्रीकृष्ण निचत, पद्मा दातीर, सुनीता राजस, राजेन्द्र वसुले, संजय पोकळे, अमित इखार, जयेश वसुले, विनोद दुधे, जगदीश सातपुते, आशिष पोटे, चंद्रशेखर यावले, प्रमोद कुऱ्हाडे, दशरथ गाडगे, किशोर राजस, नितीन सुने, संतोष बदुकले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय माजी अध्यक्ष प्रभाकर राजस यांनी करून दिला. संचालन कोषाध्यक्ष विलास पकडे यांनी केले. तर आभार संस्थेचे सचिव संदीप अंबाडकर यांनी मानले. स्वागताध्यक्ष हिरालाल लाडोळे व पानवेलीचे विमोचक प्रमोद लाडोळे यांनी सर्व अतिथींचे स्नेहील स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पानवेली बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल सुने, सचिव संदीप अंबाडकर, उपाध्यक्ष संजय सुने, कोषाध्यक्ष विलास पकडे, सहसचिव प्रा. प्रभाकर राजस, कार्यकारिणी सदस्य विजय लाडोळे, डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, अविनाश बदुकले, महादेवराव पकडे, निकेश दाभाडे, सुभाष थोरात, वासुदेवराव कुऱ्हाडे, सचिन इंगोले, शोभा सुने, योगेश हिस्सल, प्रमोद पोकळे, प्रभाकर निचत आदींनी प्रयत्न केले. मेळाव्याला बारी समाजातील आजी, माजी लोकप्रतिनिधी, डॉक्टर, उद्योजक, कृतिशील शेतकरी, शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक यांची या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.