आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:चाकूचा धाक दाखवत व्यावसायिकाच्या घरावर दरोडा, 5 ते 6 दरोडेखोरांनी 20 लाखांचा ऐवज केला लंपास

अनुप गाडगे- अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरोडेखोरांनी साव यांच्या घरातील लोखंडी कपाट फोडून ऐवज लंपास केला आहे. - Divya Marathi
दरोडेखोरांनी साव यांच्या घरातील लोखंडी कपाट फोडून ऐवज लंपास केला आहे.

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याअंतर्गत आसलेल्या मारडा गावात सोमवारी (दि. 3) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास एका व्यावसायिकाच्या घरात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी चाकुच्या धाकावर दरोडेखोरांनी 400 ग्राम सोन्यासह साडेतीन लाख रोख व अन्य ऐवज लंपास केला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

मारडा येथे निलेश रमेश साव (35) यांचे घर आहे. त्यांचे गावात कृषी सेवा केंद्र तसेच अमरावती ते कु-हा मार्गावर पेट्रोल पंपसुद्धा आहे. रात्री घरात सर्व जण झोपले असताना अज्ञात पाच ते सहा जणांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी दोन लोखंडी कपाटामध्ये असलेले सोने, चांदी व साडे तीन लाख रुपयांची रोख असा सुमारे 20 लाखांचा (बाजार मूल्यानुसार) ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्यासह ग्रामीण पोलीसांचा ताफा मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास मारडा येथे साव यांच्या घरी पोहोचला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण पोलिसांच्या सहा पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...