आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन भट यांना 'साने गुरुजी साहित्य पुरस्कार':उन्हात घर माझे घर गीत-गज़ल संग्रहाचा अकरावा सन्मान

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रख्यात गीतकार आणि गज़लकार नितीन भट यांच्या 'उन्हात घर माझे' या गीत-गज़ल संग्रहाला पूज्य साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटूर (जि. नांदेड) तर्फे कै. शंकरराव पाटील कदम स्मृती वाङ्ममय पुरस्कार जाहीर झाला आहे.

पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. बाळू दुगडूमवार यांनी कळविली आहे. हा पुरस्कार त्यांना आगामी 22 जानेवारी रोजी कुंटूर (जि. नांदेड) येथे होऊ घातलेल्या सातव्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनात प्रदान केला जाणार आहे. नितीन भट यांच्या 'उन्हात घर माझे' या काव्यसंग्रहाला प्राप्त झालेला हा सलग अकरावा पुरस्कार आहे. त्यांच्या संग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून तिला प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांचे शब्दाशीर्वादही लाभले आहेत.

यापूर्वी नितीन भट यांना विदर्भ साहित्य संघाचा 'विशेष शताब्दी पुरस्कार', नागपूरच्या साहित्य विहार संस्थेचा संकीर्ण लेखन पुरस्कार, औदुंबर (जि. सांगली) येथील सदानंद साहित्य मंडळाचा सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार, नाशिकच्या साहित्यकणा फाउंडेशनचा सुमनताई पंचभाई स्मृती पुरस्कार, ठाणे येथील मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार, अकोल्याच्या शब्दसृष्टी युवा संस्थेचा साहित्यरत्न पुरस्कार, अक्षरोदय काव्यगौरव तसेच नागपूरच्या मातोश्री संताजी संस्थेचा मातोश्री काव्यपुरस्कार तसेच पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा दामाजीनगरचा साहित्य पुरस्कार आणि दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार असे एकूण दहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...