आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Chief Minister Will Interact With 10 Teachers Of Amravati On Teacher's Day | The Three Will Speak Directly | Organizing A Video Conference At The Collector's Office

शिक्षकदिनी मुख्यमंत्री साधणार अमरावतीच्या 10 शिक्षकांशी संवाद:तिघे थेट बोलणार, जिल्हाधिकारी कार्यालयात कॉन्फरन्सचे आयोजन

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनानिमित्त सोमवारी 5 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील निवडक दहा शिक्षकांशी राज्याचे मुख्यमंत्री संवाद साधणार असून येथील तीन शिक्षकही काही विशिष्ट मुद्द्यांवर त्यांच्याशी वार्तालाप करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमासाठी निवडलेल्या दहा शिक्षकांमध्ये खासगी व्यवस्थापन व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रत्येकी पाच शिक्षकांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक दिनानिमित्त राज्य शासनाने यावर्षी आगळावेगळा कार्यक्रम ठेवला आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतची ही व्हिडीओ कॉन्फरंसिंग (व्हीसी) जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वॉर रुम’मध्ये दुपारी दीड वाजता सुरु होईल. यावेळी त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे हेही उपस्थित असतील.

यांचा समावेश

मुख्यमंत्र्यांनी या संवाद कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचे प्रत्येकी पाच अशा दहा शिक्षकांची निवड करावी, असे सूचविले होते. त्यानुसार अंकुश गावंडे (मंगरुळ चव्हाळा, नांदगाव खंडेश्वर), वैजनाथ इप्पर (घटांग, चिखलदरा), प्रकाश लिंगोट (सैदापुर, अंजनगाव सुर्जी), जयश्री गुल्हाने (भिलखेडा, चिखलदरा) व गणेश जामुनकर (जैतादेही, चिखलदरा) या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह अतुल ठाकरे (भानखेडा, अमरावती), सुफी मजहर अली (अमरावती), अंजली देव (अमरावती), मंजू अडवानी (अमरावती) आणि संजय रामावत (अमरावती) या पाच खासगी व्यवस्थापनात कार्यरत शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

हे तीन शिक्षक बोलणार मुख्यमंत्र्यांशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील दहा शिक्षकांशी संवाद साधणार असतानाच शिक्षकांपैकी तिघे वेगवेगळ्या विषयांवर सरकारची भूमिका जाणून घेणार आहेत. अतुल ठाकरे हे गणित आणि विज्ञान शिक्षक भरती या विषयावर तर जयश्री गुल्हाने ह्या विद्यार्थ्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका जाणून घेतील. त्याचवेळी संजय रामावत हे स्काऊट-गाईड प्रशिक्षण केंद्राबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सरकारची भूमिका जाणून घेतील.

बातम्या आणखी आहेत...